दुःखाचा डोंगर; शेतकरी लाँग मार्चमधील बळीराजाचाच मृत्यू, कुटुंबीय दुःखसागरात

राज्यातील शेतकरी सध्या प्रचं अडचणीत सापडला आहे. एकीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही तर दुसरीकडे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.

दुःखाचा डोंगर; शेतकरी लाँग मार्चमधील बळीराजाचाच मृत्यू, कुटुंबीय दुःखसागरात
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 9:56 PM

नाशिक : शेतकऱ्यांना वन हक्काच्या जमिनी मिळाव्या या मागणीसह अनेक मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च निघाला होता. या लाँग मार्चमध्ये नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी आपल्या शेतीसाठी सहभागी झाले होते.त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मावडीमधील पुंडलिक जाधवही लाँग मार्चमध्ये सहभागी झाले होते.मुंबईला धडकणाऱ्या या शेतकऱ्यांच्या लाँगमार्चमधील पुंडलिक जाधव यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्यामुळे आता जाधव कुटुंबीयांसह मावडी गावावर शोककळा पसरली आहे.

त्यामुळे आता तरी या शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी होणार की नाही असा सवाल आता लाँग मार्चमधील शेतकरी करू लागले आहे.

शेतकरी लाँग मार्चमधील पुंडलिक जाधव या शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मावडी गावावर शोककळा पसरली आहे. पुंडलिक जाधव जमीन नावावर करावी अशी त्यांची मागणी होती. या मागणीसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठ नाशिक जिल्ह्यातील शेतकरी लाँग मार्चमध्ये सहभागी झाले होते. मात्र पुंडलिक जाधव यांच्या मृत्यूमुळे आता लाँग मार्चमधील शेतकरी दुःखी झाले आहेत.

पुंडलिक जाधव यांच्या लाँग मार्चमध्ये सहभागी असतानाच मृत्यू झाला. त्यामुळे आता तरी शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

पुंडलिक जाधव यांच्या मृत्यूमुळे जाधव कुटुंबीय आता दुःख सागरात लोटले आहे. घरातील आधार गेल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांची झाली आहे. त्यामुळे शासनाने आता तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी मावडी ग्रामस्थांसह त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

राज्यातील शेतकरी सध्या प्रचं अडचणीत सापडला आहे. एकीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही तर दुसरीकडे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकरी चहूबाजूंनी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने आतातरी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष  द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.