Supriya Sule on Anil Deshmukh: अनिल देशमुखांबाबत मी बोलणारच, फार फार रेड पडेल, दुसरं काय होईल?; सुप्रिया सुळेंचा इशारा

Supriya Sule on Anil Deshmukh: सुप्रिया सुळे या मीडियाशी संवाद साधत होत्या. काल मी पुरंदरला होते आणि मी खूप शॉक झाले. एकाचा सत्कार केला.

Supriya Sule on Anil Deshmukh: अनिल देशमुखांबाबत मी बोलणारच, फार फार रेड पडेल, दुसरं काय होईल?; सुप्रिया सुळेंचा इशारा
अनिल देशमुखांबाबत मी बोलणारच, फार फार रेड पडेल, दुसरं काय होईल?; सुप्रिया सुळेंचा इशाराImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 3:02 PM

नाशिक: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)तुरुंगात आहेत. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात त्यांना अजूनही जामीन मिळालेला नाही. त्यावरून राष्ट्रवादीच्या (ncp) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाकी लोक बोलणार नाहीत. पण मी बोलेल. फार फार काय होईल तर रेड पडेल. पण मी बोलणारच. अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयावर 109 वेळा रेड पडली. हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हा खूप सीरियस इश्यू आहे. चार्टड अकाऊंट संघटनेला पण नोटीस बाजवली जाते. तुम्ही बाहेर बोलत जाऊ नका म्हणून त्यांना सांगितलं जातं, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. एलोरा, अजिंठा आणि ताजमहल हे आपलं आश्चर्य आहे. आपलं वैभव आहे. ताजवरून वाद होणं योग्य नाही. विनाकारण वाद होता कामा नयेत, असं त्यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळे या मीडियाशी संवाद साधत होत्या. काल मी पुरंदरला होते आणि मी खूप शॉक झाले. एकाचा सत्कार केला. त्यात हडपसरचा एक तरूण होता. बोलता बोलता तो म्हणाला की, मी लंडनला आता जाणार आहे. लंडनला तीन महिन्यासाठी जाणार आहे. पाच महिन्याचं काँट्रॅक्ट आहे. टुरिझम वाढावा म्हणून लंडनने आम्हाला टॅक्समध्ये सवलत दिली आहे. हे ऐकून मला खूप शॉक बसला. आपल्या लोकांना दुसऱ्या देशात जावे लागत आहे. आज खूप बाबतीत आपला देश मागे आहे, लिडरशीप ही सत्तेतून येत नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

आमचे आयुष्य म्हणजे 24 बाय 7 जॉब

आमचे आयुष्य म्हणजे 24 बाय 7 जॉब आहे. मार्च एप्रिलमध्ये तर ते खूपच तणावात असतात. पार्लमेंटमध्ये काम करताना जाणवते की, पैशांचे सोंग आणता येत नाही. बाकी सगळे आणता येतं. गव्हाबाबत आता जो निर्णय झाला तो विशेष आहे. श्रीलकेत जस झालं हे आपल्याकडे होणार नाही हा विश्वास आहे. पण महागाईचा प्रश्न आपण गंभीर्याने घ्यायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

नाशिक ब्रँड होतोय

मी आल्यापासून सगळे म्हणतायत की नाशिकमध्ये तुम्ही आलात आणि मिसळ नाही खाल्ली. त्यामुळे मला खावी लागली. सगळ्यात चांगली मिसळ कुठे मिळते तर नाशिकमध्ये. नाशिक हा ब्रँड झालाय मिसळीचा. चहाच्या दुकानाला तर आता आमदार चहा, खासदार चहा काहीही नावे देतात, असंही ते म्हणाले.

करायला गेले एक झाले दुसरे

भोंगा म्हणजे करायला गेले एक आणि झाले दुसरे… करायला काय गेले आणि शिर्डीतला भोंगा पहिले काढावा लागला. कोरोना काळात सेवा देतांना कोणी जात बघितली का? सिप्ला कंपनी देखील हमीदची आहे, असंही त्या म्हणाल्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.