लिस्टमधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड, किरीट सोमय्यांचा जाहीर दावा; आव्हाडांना ईडीची नोटीस येणार?

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये येऊन मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. (ED'S next target jitendra awhad?; know what kirit somaiya said)

लिस्टमधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड, किरीट सोमय्यांचा जाहीर दावा; आव्हाडांना ईडीची नोटीस येणार?
jitendra awhad
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 3:28 PM

नाशिक: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये येऊन मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (ED’S next target jitendra awhad?; know what kirit somaiya said)

किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये येऊन आधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू कोण आहे? असा सवाल सोमय्यांना करण्यात आला. त्यावर लिस्टमधला 12वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहे, असं मोठं विधान सोमय्या यांनी केलं आहे. तसेच यावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं. त्यांनी हसून उत्तर देणं टाळलं. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार आहे का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भावना गवळींवर आरोप

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळींवरही आणखी एक गंभीर आरोप केला. एका ट्रस्टचे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत रूपांतर करून 70 कोटी रुपयांची मालमत्ता आपल्या पीएच्या नावावर करण्यात आली. या ट्रस्टची महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत रुपांतर करताना बोगस कागदपत्रे वापरण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्याची आमची मागणी आहे, असं सोमय्या म्हणाले.

परब यांची तक्रार मीच दिली

यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीवरही प्रतिक्रिया दिली. परब यांच्याविरोधात मी पहिली तक्रार दिली होती. त्याची सुनावणी सुरू आहे. परब यांच्या मर्जीतील अधिकारी बजरंग खरमाटे यांचीही चौकशी सुरू आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना लपवून ठेवलं. आमदार प्रताप सरनाईक यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असं सोमय्या म्हणाले.

उद्धव ठाकरेंना करून दिलं स्मरण

यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जुन्या गोष्टीचं स्मरण करून दिलं. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असताना ईडीने केलेल्या कारवाईच कौतुक केलं होतं. मग आता भ्रष्ट नेत्यांना मंत्रिमंडळात कसं ठेवू शकता?, असा सवाल त्यांनी केला.

आतापर्यंत कुणाकुणावर कारवाई

दोन दिवसांपूर्वी सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंत कुणाकुणावर कारवाई झाली याची यादीच दिली होती. ठाकरे सरकारची घोटाळा इलेव्हन. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी अनधिकृत बांधकाम केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वसुली कांडात ईडीने पुरावे दिले. परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट, परिवहन विभागात चौकशी, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले, माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएचा भूखंड प्रकरणी चौकशी सुरु, छगन भुजबळांवर आरोप आहेत. शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी UAEमध्ये पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि पाडला, अशी माहिती त्यांनी दिली. (ED’S next target jitendra awhad?; know what kirit somaiya said)

संबंधित बातम्या:

आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा; गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचले

…तर आम्ही गपचूप बसणार नाहीत, भविष्यात शब्द जपून वापरा, नाशिकमध्ये भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांचा राणेंना इशारा

योग्यवेळी सीडी लावणार; ईडीच्या चौकशीवरून एकनाथ खडसेंचा पुन्हा इशारा

(ED’S next target jitendra awhad?; know what kirit somaiya said)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.