Nashik | शेतकऱ्याने तब्बल 15 लाखांचे वीजबिल भरून मिळवला थकबाकीमुक्तीचा मान…!

राज्य शासन व महावितरणने कृषी वीज धोरणात दिलेल्या घसघशीत सवलतीचा लाभ घेत तळोदा तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी हाजी निसारअली शेरमोहम्मद मक्रानी यांनी तब्बल पंधरा लाखांचे वीजबिल भरले आहे. विशेष म्हणजे ते राज्य शासनाचा वसंतराव नाईक कृषिनिष्ठ पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्या या उदाहरणाने अजूनही अनेक शेतकरी तळमळीने वीजबिल भरतात हेच समोर आले आहे.

Nashik | शेतकऱ्याने तब्बल 15 लाखांचे वीजबिल भरून मिळवला थकबाकीमुक्तीचा मान...!
शेतकरी हाजी निसारअली यांचा उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील, सहायक अभियंता चेतन पाचपांडे यांनी सत्कार केला.
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 2:34 PM

नाशिकः एकीकडे आज ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देत तीन महिने वीज न तोडण्याचा निर्णय जाहीर केला. शिवाय ज्यांची वीज तोडली आहे, ती जोडली जाईल, असेही सांगितले. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने तब्बल 15 लाखांचे वीजबिल (Electricity Bill) भरून थकबाकीमुक्तीचा मान मिळाल्याचे समोर आले आहे. राज्य शासन व महावितरणने (MSEDCL) कृषी वीज धोरणात दिलेल्या घसघशीत सवलतीचा लाभ घेत तळोदा तालुक्यातील (जि. नंदुरबार) प्रगतिशील शेतकरी हाजी निसारअली शेरमोहम्मद मक्रानी यांनी हे वीजबिल भरले. विशेष म्हणजे ते राज्य शासनाचा वसंतराव नाईक कृषिनिष्ठ पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्या या उदाहरणाने अजूनही अनेक शेतकरी तळमळीने वीजबिल भरतात हेच समोर आले आहे. तसेच त्यांच्यामुळे इतरांनाही बिल भरण्याची प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे महावितरणच्या वतीनेही पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.

एकूण 27 कृषिपंप

तळोद्यासह तालुक्यातील दलेलपूर व प्रतापपूर येथे ते स्वतःच्या शेतीसह इतर काही लोकांची भाडेतत्वावर शेती करतात. या शेतीच्या सिंचनासाठी सर्व ठिकाणी एकूण 27 कृषिपंप वापरत आहेत. ते नेहमी महावितरणला सहकार्य करतात. मात्र, काही कारणाने या पंपांचे वीजबिल थकित होते. शासनाने कृषी वीज धोरण आणल्यावर त्यांच्या सर्व संबंधित लोकांची महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी 3 ते 4 वेळा बैठक घेतली. त्यात हाजी निसारअली यांनी योजना समजून घेतली. त्यानंतर शनिवारी तळोदा येथे लोकअदालत असल्याने महावितरणने न्यायालय परिसरातच कृषी वीजबिल मेळावा आयोजित केला होता. त्यात ग्राहकांना कृषी धोरणाचे फायदे समजावून सांगण्यात आले. यावेळी वेळी निसारअली मक्राणी हेदेखील उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या सर्व शंका विचारल्या, सविस्तर चर्चा केली. त्यांनी मी आज दुपारी बिल भरतो, असे आश्वासन दिले व दुपारी कार्यलयात येऊन एकूण 20 वीजबिलांची 15 लाख 23 हजार 70 रुपयांची थकबाकी रोख व धनादेशाद्वारे भरली आणि ते थकबाकीमुक्त झाले.

महावितरणने केला सत्कार

एका शेतकऱ्याने पुढाकार घेऊन इतके मोठे बिल भरल्याने त्यांचे कौतुक होत आहे. तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसमोरही त्यांनी आपला आदर्श ठेवला आहे. या कर्तव्यदक्षतेचे महावितरणच्या वतीने उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील यांनी निसारअली यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सहायक अभियंता चेतन पाचपांडे, कनिष्ठ अभियंता विलास गुरव उपस्थित होते. उर्वरित पंपांच्या बिलांची 7 लाखांची थकबाकी 25 तारखेपर्यंत भरण्याचे तसेच इतर ठिकाणीही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्याचे आश्वासन निसारअली यांनी दिले. या वसुलीसाठी अभियंत्यांसह तंत्रज्ञ बी एन. राजपूत, ए.एच. कलाल, आनंदसिंग गिरासे यांनी प्रयत्न केले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

Video | ‘अभिव्यक्ती’ म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे, संविधानाचा गैरअर्थ नको; उज्ज्वल निकमांकडून कोर्टाचे स्वागत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.