ये हिंदुस्तान सभी का…मैं भारतीय मुस्लिम हूं चाइनीज नहीं; फारुख अब्दुल्लांनी भाजपवर डागली तोफ…

मी मुस्लिम असलो तरी मी भारतीय मुस्लिम असल्याचे त्यांनी ठणकाऊन सांगत असतानाच त्यांनी मी चिनी मुस्लिम नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.

ये हिंदुस्तान सभी का…मैं भारतीय मुस्लिम हूं चाइनीज नहीं; फारुख अब्दुल्लांनी भाजपवर डागली तोफ...
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 8:23 PM

नाशिकः केंद्र सरकारवर देशातील मुस्लिमांसोबत गैरवर्तनाचा करत असल्याचा आरोप करत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला (Former Chief Minister Farooq Abdullah) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. हा हिंदुस्थान सर्वांचा असून मी भारतीय मुस्लिम (Indian Muslim) आहे, चिनी नाही अशा स्पष्ट शब्दातही त्यांनी सुनावलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ही माहिती दिली.

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी बोलताना सांगितले की, आम्ही भारतीयांसोबतच आहोत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश एकसंध ठेवायचाआ आहे.

मी मुस्लिम असलो तरी मी भारतीय मुस्लिम असल्याचे त्यांनी ठणकाऊन सांगत असतानाच त्यांनी मी चिनी मुस्लिम नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व असले तरी सगळ्यांनी एकत्र येऊन हा देश घडवू शकतो, कारण आपल्यामध्ये मैत्रभाव असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी धर्मावर बोलत असताना सांगितले की, धर्म लोकांना एकमेकांचा द्वेष करायला शिकवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

फारुख अब्दुल्ला यांचे हे विधान भाजपच्या दोन नेत्यांनी (एक खासदार आणि एक आमदार) केलेल्या वक्तव्यानंतर आले आहे. 9 ऑक्टोबर रोजी दिल्लीत झालेल्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्या कार्यक्रमामध्ये भाजप खासदार परवेश वर्मा यांनी एका विशिष्ट समाजावर बहिष्कार घालण्याच्या सूचना केल्या होत्या. यावरुनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

भाजप खासदाराच्या या वक्तव्यावरुन जोरदार हल्लाबोल केला होता. या परवेश वर्मा यांनी जाहीर वक्तव्य करुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी का शांत आहेत तेच कळत नाही असं म्हणत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

यावेळी लालू प्रसाद यादव यांनीही भाजप समाजाला जातीयवादी करत असून संविधान नष्ट करत असल्याचा आरोप केला आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गीतकार जावेद अख्तर आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.