मोठी बातमी : नाशिकमधील भावली धरणामध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू, सोलापूरमध्ये उलटली बोट

नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातून एक वाईट आणि धक्कादायक बातमी आहे. धरणाकडे गेलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोलापूरमधील उजणी धरणात बोट उलटल्याची घटनाही समोर आली आहे.

मोठी बातमी : नाशिकमधील भावली धरणामध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू, सोलापूरमध्ये उलटली बोट
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 9:24 PM

नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील धरणावर गेलेल्या पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. पाच जणांच्या मृत्यूने गोसावी वाडीमध्ये शोककळा पसरली आहे. दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले मात्र अंदाज न आल्याने  ते बुडू लागले तेव्हा इतरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला खरा पण उलटच घडलं. सर्वांचा म्हणजेच पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

अनस खान दिलदार खान, वय 17 वर्ष, नाझिया इमरान खान, वय – 15 वर्ष, मीजबाह दिलदार खान, वय – 16 वर्ष, हनीफ अहमद शेख, वय – 24 वर्ष, ईकरा दिलदार खान, वय 14 वर्ष या सर्वांचा बुडुन मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गोसावीवाडीत शोककळा पसरली असुन नातेवाईकांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती. सर्वांचा मृत्यु झाल्याने या सर्वांना पाण्या बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी धाव घेवुन मदतकार्य करत हे सर्व मृतदेह इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते.

उजणी धरणामध्ये उलटली बोट

सोलापूरमधील करमाळ्यातील उजणी धरणामध्ये बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे. यामधील चौघेजण बेपत्ता असून एकाला वाचवण्यात यश आलं आहे. आता शोध मोहिम सुरू असून काहीजण बुडाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.