Nashik Crime: नाशिक शहर हादरले; गेल्या 24 तासात 4 हत्या; खुनाची मालिका थांबणार कधी?
गेल्या 24 तासात 4 हत्या झाल्या आहेत हे हत्याकांडाचा सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण दिसून येत आहेत. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या या हत्यांबाबत पोलिसांनी तातडीने तपास करत गुन्ह्याची उकल करून संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नाशिकः नाशिक शहरात गेल्या 24 तासात तब्बल 4 हत्या (Four murder) झाल्याने शहर हादरून गेलं आहे. शहरातील खुनाची ही मालिका सुरुच असल्याने नाशिक शहरात (Nashik City) वावरणाऱ्या नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण दिसत आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने या प्रकरणाती संबंधित आरोपींवर कडक करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या घटनेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण (crime rate) वाढले असल्याचे मत जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.
काल शहरातील म्हसरुळ परिसरात एका 24 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या झाली होती त्यानंतर आज पहाटे नाशिकच्या द्वारका परिसरात असलेल्या पौर्णिमा स्टॉपजवळ एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.
लुटमारीतून हत्या
पोलिसांच्या प्राथमिक तपासात खून झालेल्या व्यक्तीजवळ मिळालेल्या आधार कार्डवरून मृत व्यक्ती हा पुणे येथील असल्याचे समजले आहे तर लुटमारीच्या प्रकारातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हत्येचे कारण अस्पष्टच
तर शहरातीलच गंगापूर रोडवर असलेल्या आनंदवल्ली भागात विपुल खैरे या युवकाची हत्या करण्यात आली आहे. अद्यापही या हत्येचे कारण अस्पष्ट आहे. तर पंचवटीतील एका घटनेत बापानेच मुलाचा खून करून आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण
गेल्या 24 तासात 4 हत्या झाल्या आहेत हे हत्याकांडाचा सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण दिसून येत आहेत. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या या हत्यांबाबत पोलिसांनी तातडीने तपास करत गुन्ह्याची उकल करून संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनांबाबत पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून याची माहिती देण्यात आली आहे. शहरात रोजच हाणामारी ,दुचाकी चोरी सोनसाखळी चोरी, लुटमार या सारखे प्रकार घडत असताना आता गेल्या 24 तासात 4 हत्या झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.