Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate | रशिया – युक्रेन युद्ध भडकताच सोने सर्वोच्च दरावर; भाव 53 हजारांवर!

जागतिक पातळीवर युद्धाची शक्यता आहे. शेअर बाजाराबाबत लोकांना विश्वास नाही. महागाई वाढलेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. त्याचा परिणाम सोन्याचा भाव वाढ होण्यात होत आहे. येणाऱ्या काळात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

Gold Rate | रशिया - युक्रेन युद्ध भडकताच सोने सर्वोच्च दरावर; भाव 53 हजारांवर!
gold
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 4:59 PM

नाशिकः जगाला विनाशाच्या खाईकडे नेणारे रशिया – युक्रेन (Russia-Ukraine) युद्ध भडकताच एकीकडे शेअर बाजार (Share Market) गडगडला तर दुसरीकडे सोने (Gold) सर्वोच्च दरावर गेलेले दिसले. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर तीन टक्के जीएसटीसह 10 ग्रॅमच्या मागे 53 हजारांवार गेला. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 50980 वर गेला. ही गेल्या वर्षातली सर्वोच्च भाववाढ आहे, अशी माहिती दी नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. येणाऱ्या काळात सोन्याचे दर वाढू शकतात. कारण एकीकडे महागाई वाढत आहे. शेअर बाजाराची विश्वासार्हता नाही. हे पाहता गुंतवणूकदार सोन्याकडे वळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

असे आहेत दर

देशाची राजधानी नवी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 51110 रुपये नोंदवले गेले, 22 कॅरेट सोन्याचे दर 46850 रुपये नोंदवले गेले. मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 51110 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46850 रुपये नोंदवले गेले. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 51200 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46900 रुपये नोंदवले गेले. नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 51200 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46900 रुपये नोंदवले गेले. विशेष म्हणजे या दरावर तीन टक्के जीएसटी अतिरिक्त असेल.

भाववाढीची शक्यता

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जागतिक पातळीवर युद्धाची शक्यता आहे. शेअर बाजाराबाबत लोकांना विश्वास नाही. महागाई वाढलेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. त्याचा परिणाम सोन्याचा भाव वाढ होण्यात होत आहे. येणाऱ्या काळात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. – गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास…!

महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!

नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?

प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.