श्रीरामाने देशाला एक केले, त्यांचे चारित्र्य जेवढे अभ्यासू, तेवढीच आयुष्यात प्रगती; नाशिकमध्ये राज्यपालांचे प्रतिपादन
श्रीरामाने देशाला एक केले आहे. आपण श्रीरामाचे चारित्र्य जेवढे अभ्यासू, तेवढीच आयुष्यात प्रगती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
नाशिकः श्रीरामाने देशाला एक केले आहे. आपण श्रीरामाचे चारित्र्य जेवढे अभ्यासू, तेवढीच आयुष्यात प्रगती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले. राज्यपाल दोन दिवसांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह श्रीकाळाराम मंदिरास भेट देत दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, नाशिकमधील श्रीकाळाराम मंदिरात मी प्रत्येक वेळेस येऊ शकणार नाही, पण आपण तरी इथे दररोज दर्शन घ्यावे. रामाने श्रीलंका जिंकून त्यांना परत केली, किती मोठी गोष्ट. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. श्रीरामाचे चारित्र्य जेवढे अभ्यासू, तेवढीच आयुष्यात प्रगती होईल. त्यामुळेच महात्मा गांधी म्हणायचे, रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. प्रभू रामचंद्रांसारखा आदर्श ठेवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राम सर्वांसाठी प्रेरणादायी…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, श्रीरामाच्या आयुष्यापासून सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी. रामाने देशाला एक केले. देशाच्या आत्म्यात, नसानसात श्रीराम वसलेले आहेत. अयोध्येत श्रीरामांचे मंदिर लवकरात लवकर बनेल आणि देशात रामराज्य येईल. यावेळी त्यांनी रामनवमीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छाही दिल्या. राज्यपाल कालपासून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आजही त्यांचे विविध कार्यक्रम आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामनवमी निमित्त नाशिक येथील प्रसिद्ध काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतले व पूजा अर्चा केली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. pic.twitter.com/bLfB8I2SLf
— Governor of Maharashtra (@maha_governor) April 10, 2022
राज्यपालांचा सत्कार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मंत्री छगन भुजबळांनी काळारामांचे दर्शन घेतले. यावेळी दोघांच्याही हस्ते आरती करण्यात आली. मंदिर संस्थानच्या वतीने राज्यपाल व भुजबळांचा सत्कार करण्यात आला. त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.
श्रीरामाच्या आयुष्यापासून सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी. रामाने देशाला एक केले. देशाच्या आत्म्यात, नसानसात श्रीराम वसलेले आहेत. अयोध्येत श्रीरामांचे मंदिर लवकरात लवकर बनेल आणि देशात रामराज्य येईल. – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
इतर बातम्याः