मी राज्यपाल नाही, तर राज्यसेवक आहे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

शासनात काम करणाऱ्यांना देखील दैवी दृष्टी मिळावी," असा टोला भगतसिंह कोश्यारी यांनी लगावला.(Governor bhagat singh koshyari Nashik speech) 

मी राज्यपाल नाही, तर राज्यसेवक आहे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 8:24 PM

नाशिक : “मी राज्यपाल नाही, तर राज्यसेवक आहे,” असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. नाशिकमधील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडच्या कार्यक्रमाला राज्यपालांनी उपस्थिती लावली. (Governor bhagat singh koshyari Nashik speech)

“मी राज्यपाल नाही. तर राज्याचा सेवक आहे. दान देणाऱ्या दानशुरांमुळेच देश चालतो. अंध विद्यार्थ्यांकडून काम करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दैवी देणगी मिळाली आहे. त्यामुळे दृष्टी बाधितांसाठी काम करणाऱ्यांना अभिवादन. शासनात काम करणाऱ्यांना देखील दैवी दृष्टी मिळावी,” असा टोला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लगावला.

सरकार नेमकं काय करतंय?; राज्यपालांचा सवाल

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतंच गुलाबी गाव भिंतघर या ठिकाणी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते सुरगणा येथे आदिवासी लाभार्थ्यांना वनकट्ट्यांचं वाटप करण्यात आलं. एकूण 11137 लाभार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सातबारा प्रदान करण्यात आले. त्यावेळी राज्यपालांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

याप्रसंगी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळही उपस्थित होते. यावेळी झिरवळ यांनी राज्यपालांकडे या भागाची समस्या मांडली. या भागात भरपूर पाऊस पडतो. पण सर्व पाणी समुद्राला वाहून जातं. पाणी अडवण्यासाठी तुम्ही मदत करा. हा भाग समृद्ध होईल, असं झिरवळ म्हणाले.

झिरवळ यांच्या मागणीचा हाच धागा पकडून राज्यपालांनी राज्य सरकारला टोले लगावले. झिरवळ सरकारमध्ये आहेत. पण ते माझ्याकडे मागणी करतात. मग राज्य सरकार काय करतंय? धावपटू कविता राऊतला नोकरी देण्यात आली नाही. क्रीडामंत्री केवळ नोकरी देण्याची भाषा करत आहेत. काहीच करत नाही. मग सरकार नेमकं काय करतंय, असा सवाल राज्यपालांनी केला.

आदिवासींनी मुख्य प्रवाहात यावं

शहरं झपाट्याने वाढली. त्यांचा विकासही झाला. मात्र आदिवासी कायम दुर्लक्षित राहिला आहे. गरजा कमी पडल्या तरी अडचणी असतात. तरीही आदिवासी कायम आनंदी राहिला आहे. घरासाठी आदिवासी सरपण तोडत असतील तर वनाधिकाऱ्यांनी त्यांना खुशाल सरपण तोडू द्यावं, अशा सूचना करतानाच आदिवासी समाजाने मुख्य प्रवाहात यायला हवं, असं आवाहनही त्यांनी केलं. (Governor bhagat singh koshyari Nashik speech)

संबंधित बातम्या : 

सरकार नेमकं काय करतंय?; राज्यपालांचा ठाकरे सरकारला सवाल

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.