Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election Results 2022 : तुम्हाला दुरुस्त करावंच लागेल, गुलाबराव पाटलांचा थेट शिवसेना नेतृत्वालाच सल्ला, फडणवीसांचही कौतुक

राज्यसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करतानाच आता आपले काय चुकले याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आल्याचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

Rajya Sabha Election Results 2022 : तुम्हाला दुरुस्त करावंच लागेल, गुलाबराव पाटलांचा थेट शिवसेना नेतृत्वालाच सल्ला, फडणवीसांचही कौतुक
गुलाबराव पाटील/देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 11:11 AM

नाशिक : देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) चाल तुम्हाला योग्य वाटली नसेल तर तुम्हाला दुरूस्त करावे लागेल. नाही दुरूस्त केली तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो, असा थेट सल्ला शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी नेतृत्वाला दिला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. आपली एक सीट पडत आहे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांची चाल यशस्वी झाली, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. राज्यसभा निवडणुकीतील या पराभवाबद्दल त्यांनी पक्षनेतृत्वालाच गंभीरतेने विचार करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, की मनात नव्हता असा निकाल आला आहे. व्हीप (Whip) असल्याने पक्षाच्या लोकांचे चुकलेले नाही, मात्र 10 लोकांनी गडबड केली आणि विरोधक त्यांच्या चालीत यशस्वी झाले, असा आरोप त्यांनी केला.

‘लोक सांभाळण्यात आम्ही कमी पडलो’

राज्यसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करतानाच आता आपले काय चुकले याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आल्याचे म्हटले. ते काय आपली आरती करणार नाही. त्यांचा गेम यशस्वी ठरला आहे. शेवटी विश्वास ठेवावा लागतो, असे म्हणत महाविकास आघाडीमध्ये कोटा ठरवण्याबाबत वाद नव्हता. कोटा कमी केला काय किंवा वाढवला काय. लोक सांभाळण्यात आम्ही कमी पडलो. ते सांभाळले असते, तर असे झाले नसते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. भाजपाला मिळालेली मदत आम्हाला मिळाली असती तर विजय झाला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

हे सुद्धा वाचा

‘वरिष्ठांच्या कानात सांगावे लागेल’

शिवसेनेला फायदा होईल ते करणे आता गरजेचे आहे. सिंहावलोकन करावे लागणार आहे. तर दुसरीकडे या निकालावरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. 20 तारखेपर्यंत आओ मेरे घर असेच म्हणावे लागेल. विरोधक चालीत यशस्वी झाले. आता आम्हाला चिंतन, मनन करायची गरज आहे. शिवसेनेला फायद्याचे होईल ते वरिष्ठांच्या कानात सांगावे लागेल. आत्ताच योग्य निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.