राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे मोठं काम केलं नाही; गुलाबराव पाटलांचा टोला

मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि प्रत्येकाला प्रत्येकी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. (gulabrao patil)

राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे मोठं काम केलं नाही; गुलाबराव पाटलांचा टोला
gulabrao patil
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 1:48 PM

नाशिक: मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि प्रत्येकाला प्रत्येकी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज यांच्या या मागणीवर टीका केली आहे. राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे मोठं काम केलं नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

गुलाबराव पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य. पण त्यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. राजकारण करू नका, असं पाटील म्हणाले. मागणी करणं सोपं आहे. पण निर्णय पंचनाम्यानंतरच घेतला जाईल. प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून ओला दुष्काळ जाहीर केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

जळगाव जिल्ह्यात 3500 हेक्टर केळीचं नुकसान

जळगाव जिल्ह्यात 3500 हेक्टर केळीचं नुकसान झालं आहे. अनेक घरं आणि शेतजमिनीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यासाठी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येकाचा पिकपेरा वेगळा असल्याने सरसकट मदत करता येणार नाही. पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करूनच शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. सरसकट पंचनामे करण्यात येत आहेत. म्हणजेच ओला दुष्काळ म्हणून सरकारने या अतिवृष्टीची नोंद घेतली आहे. कॅबिनेटमध्ये पूर्ण माहिती आल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. अतिवृष्टीसाठी केंद्राने मदत देण्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा संकटाच्याकाळात केंद्र सरकारने राज्याला पैसे द्यायला हवे. मात्र, केंद्र काही मदत देत नाही, असं ते म्हणाले.

खडसेंना ईडीची नोटीस आल्याची चर्चा

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आलेल्या नोटिशीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ खडसे काल जळगावात होते. त्यांना ईडीने नोटीस पाठवल्याची चर्चा होती. खडसे यांच्या पत्नीच्या नावानं जमीन खरेदी असल्यानं त्यांना नोटीस आल्याचं कळतं, असं ते म्हणाले.

कांदेंनी धमकीला घाबरू नये

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सुहास कांदे यांनी धमकीला घाबरू नये. आपण बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. भुजबळ आणी कांदे यांनी बसून वाद सोडवावा. पालकांनी बालकाप्रमाणे आणि बालकाने पालकाप्रमाणे वागू नये, असा टोलाही त्यांनी भुजबळांना लगावला.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री किती मिनिटांचा दौरा करतात हे पाहावं लागेल, संदीप देशपांडेंचा टोला

कधी ढगफुटी, कधी दुष्काळ, शेतीचं मोठं नुकसान टाळण्यासाठी पठ्ठ्याने स्वत:च शेतात हवामान केंद्र उभारलं!

सफाई कामगारांची भरती प्रक्रिया राबवा; राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या ठाणे पालिकेला सूचना

(gulabrao patil taunt raj thackeray over demand to Declare a wet drought in Maharashtra)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.