Nashik Rain | नाशिकच्या बागलाण आणि मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ढगफुटी सदृश्य पाऊस, मोसम नदीला पूर…

काल सायंकाळी नाशिकच्या बागलाण आणि मालेगाव तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीयं. अनेक ठिकाणचे रस्ते फुटले तर गाळणे येथील बैलजोडी वाहून गेल्याची घटना घडली घडलीयं. ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बैलजोडीचा रात्री उशीरापर्यंत शोध घेतला.

Nashik Rain | नाशिकच्या बागलाण आणि मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ढगफुटी सदृश्य पाऊस, मोसम नदीला पूर...
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 9:18 AM

मालेगाव : नाशिकच्या (Nashik) मालेगाव आणि बागलाण तालुक्यात सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. या मुसळधार पावसानंतर ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळित झाल्याचे चित्र आहे. अचानक हजेरी लागलेल्या पावसाने (Rain) परिसरातील शेतीपिके पाण्याखाली गेल्याने शेतजमीन देखील वाहून गेल्या आहेत. तसेच या पावसाने अनेक शेतकरी शेतामध्येच अडकून पडले होते. इतकेच नाही तर या ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक ठिकाणचे रस्ते फुटले आहेत. अगोदरच बागलाण आणि मालेगाव (Malegaon) तालुक्यात रस्त्यांची समस्या असताना या पावसामुळे रस्त्याची चाळण झालीयं.

नाशिकच्या बागलाण आणि मालेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

काल सायंकाळी नाशिकच्या बागलाण आणि मालेगाव तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीयं. अनेक ठिकाणचे रस्ते फुटले तर गाळणे येथील बैलजोडी वाहून गेल्याची घटना घडली घडलीयं. ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बैलजोडीचा रात्री उशीरापर्यंत शोध घेतला. बागलाण तालुक्यातील शिरपूरवडेसह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोसम नदीला हंगामातील दुसरा पूर आला आहे. मोसम नदीच्या पाणीपातळीच मोठी वाढ झालीयं.

हे सुद्धा वाचा

तहसीलदार सी. आर राजपूत आणि आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी केली पाहणी

शहरातील सांडवा पूल पाण्याखाली गेला असून किल्ला झोपडपट्टीत पाणी शिरले आहे. तहसीलदार सी. आर राजपूत आणि आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी या परिसराची पाहणी केलीयं. खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत बागलाणमधील श्रीपुरवडे शिवारात ढगफुटी सदृश पर्जन्यवृष्टी झाली असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचा इशाराही देण्यात आलायं.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.