निफाडमध्ये मुसळधार, नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग, मराठवाड्याला दिलासा
नांदूर-मधमेश्वर धरणातून पहिला पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय. आज सकाळी मराठवाड्याच्या दिशेने गोदावरी नदी पत्रात 6 हजार 310 क्यूसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील गावांमध्ये संततधार पाऊस होतोय. सततच्या पावसामुळे गोदावरी नदीच्या उपनद्या आणि ओढे नाल्यांना पूर आलेला आहे. निफाड तालुक्यात असलेल्या नांदूर-मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हे पुराचे पाणी दाखल होत आहे. या धरणातून पहिला पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय. (Heavy rain in nashik Niphad Water released From Nandur Madhmeshwar Dam)
नाशिक-निफाडमध्ये मुसळधार; नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग
नाशिक जिल्हातील गंगापूर, दारणा धरणाच्या परिसरात जरी पाऊस होत असला तरी धरणाची पाणी पातळी अध्याप पन्नास टक्क्यांच्या खाली आहे.पण गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील गावांमध्ये होत असलेल्या संततधार पावसाच्या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या उप नद्या व नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत आहे. धरणातून आता पाण्याचा पहिला विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिलासा देणारी बातमी आहे.
गोदावरी नदी पत्रात 6 हजार 310 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग
आज सकाळी मराठवाड्याच्या दिशेने गोदावरी नदी पत्रात 6 हजार 310 क्यूसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुराचे पाणी दाखल झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने आज सकाळी सहा वाजेपासून 400 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला होता.
पुराचे पाणी कमी होताच पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्याने बंद होणार
हळूहळू वाढ करत पाण्याच्या विसर्ग 6 हजार 310 वेगाने सुरू असून धरण क्षेत्रातील पाणीपातळी पुराचे पाणी कमी होताच पाण्याचा सुरु असलेला विसर्ग टप्प्याटप्याने कमी करत बंद केला जाणार आहे.
(Heavy rain in nashik Niphad Water released From Nandur Madhmeshwar Dam)
हे ही वाचा :
Chiplun Flood: चिपळूणमध्ये महाप्रलय, 2005 पेक्षाही भयंकर पूर, खासदार विनायक राऊत दिल्लीवरुन कोकणाकडे
Mumbai Rains Maharashtra Monsoon Live | चिपळूण शहरातील पूर स्थिती जैसे थे, दहा तासापासून शहरात पाणी