नाशिकमध्ये 21 जूनच्या मराठा मूक मोर्चाची जय्यत तयारी, संभाजीराजेंसह अनेक कार्यकर्ते रवाना
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सोमवारी (21 जून रोजी) होत असलेल्या मराठा मूक मोर्चाची नाशिकमध्ये जय्यत तयारी करण्यात आलीय.
नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सोमवारी (21 जून रोजी) होत असलेल्या मराठा मूक मोर्चाची नाशिकमध्ये जय्यत तयारी करण्यात आलीय. खासदार संभाजीराजे छत्रपती देखील या मोर्चासाठी नाशिककडे रवाना झालेत. नाशिकला जात असताना संभाजीराजे यांचं ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून उत्स्फुर्त स्वागतही करण्यात आले. छत्रपती संभाजीराजे उद्या नाशिकमध्ये मराठा मोर्चाची पुढील दिशा ठरवणार आहेत. याकडेही सर्वांचंच लक्ष लागलंय (Huge preparation for Maratha Kranti Morcha in Nashik Sambhajiraje Chhatrapati on the way).
नाशिकमध्ये मराठा समाजाच्यावतीने आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीमध्ये मूक आंदोलन केलं जाणार आहे. हजारो मराठा आंदोलक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार या ठिकाणी जय्यत तयारीही करण्यात आलीय.
दि. २१ जून रोजी होणाऱ्या मराठा क्रांती मूक आंदोलनाकरिता नाशिकला जात असताना मार्गात ठिकठिकाणी उस्फूर्त स्वागत करण्यात आले… pic.twitter.com/LsQFe1YD1R
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 20, 2021
नाशिकला पुढील निर्णय
दरम्यान, कोल्हापूरमध्ये सुरु झालेलं मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. हे आंदोलन 36 जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत त्यांनी आंदोलन थांबवण्याबाबत विनंती केली. मात्र, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते. त्यानंतर आता नाशिकला 21 जूनला सकल मराठा समाजाच्यावतीनं मूक आंदोलन होत आहे.
23 जिल्ह्यात वसतिगृहाबाबत काम सुरु
36 जिल्ह्यांपैकी 23 जिल्हे सरकारने निवडले आहेत. सरकारची इमारत असलेल्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी लागणाऱ्या पैशाची जबाबदारी सरकार घेणार आहे. आण्णासाहेब पाटील महामंडळाच्याकर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 25 लाखापर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. त्यालाही सरकारनं मान्यता दिलीय असं देखील ते म्हणाले होते.
मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे
याशिवाय राज्य सरकारसोबच्या बैठकीत 2014 पासूनच्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न, मराठा आरक्षण आंदोलनातील 1 गुन्हा वगळता इतर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भात एक समिती देखील स्थापन केली जाईल, असं सरकारनं सांगितल्याचं संभाजीराजे म्हणाले होते.
हेही वाचा :
सारथी संस्थेसाठी 1 हजार कोटी मागितले, सकारात्मक चर्चा सुरु, अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर संभाजीराजे यांची माहिती
मूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती
राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणार, सारथी संदर्भात शनिवारी बैठक होणार
व्हिडीओ पाहा :
Huge preparation for Maratha Kranti Morcha in Nashik Sambhajiraje Chhatrapati on the way