भाजपमध्ये विखेंना मान मिळतो की नाही याबाबत मला माहीत नाही – Chhagan Bhujbal
पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. यावेळी ते म्हणाले की इतरांप्रमाणे पैसे देऊन ज्या आमदारांना घरं नाहीत. अशा आमदारांना पैसे देऊन घरे मिळत असेल तर विरोध करण्याचा कोणताही कारण नाही. तसेच मुख्यमंत्री काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी, शिवसेनेसह विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुध्दा योग्य मान देतात.
नाशिक – पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. यावेळी ते म्हणाले की इतरांप्रमाणे पैसे देऊन ज्या आमदारांना घरं नाहीत. अशा आमदारांना पैसे देऊन घरे मिळत असेल तर विरोध करण्याचा कोणताही कारण नाही. तसेच मुख्यमंत्री काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी, शिवसेनेसह विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुध्दा योग्य मान देतात. त्यामुळे विखे यांना मान आहे की नाही याबाबत काही मला माहीत नाही अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना घरे देण्याची घोषणा केल्यापासून त्यांच्यावरती अनेकजण टीका करीत आहेत. तसेच आमदारांना घरे देण्याची गरज आहे का असे अनेक प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले जात आहेत. ज्या आमदारांना मुंबईत राहण्यासाठी घर नाहीत अशा आमदारांसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जात आहे.तसेच ज्या आमदारांना घरे पाहिजे आहेत. त्यांच्याकडून घराची किंमत देखील वसूल करण्यात येणार आहे.
आमदारांना घरं द्यायचा निर्णयाला सामान्यांचा विरोध
मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी आमदारांना 300 घर बांधण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र या निर्णयाला सामान्य जनता सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोध केला आहे. या निर्णयाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील विरोध केला आहे. यावर छगन भुजबळ यांना विचारले असता. भुजबळ म्हणाले की, आत्तापर्यंत मुंबई शहरामध्ये पोलीस,आयएसओ ऑफिसर, वेगवेगळे कलाकार या सगळ्यांना हाउसिंग सोसायटीमध्ये जागा देऊन त्यांनी स्वतःच्या खर्चाने बांधकाम करून मुंबईमध्ये स्थायिक झाले आहे. ज्याप्रमाणे इतरांना घरे देत आहोत त्याचप्रमाणे आमदारांना सुद्धा सोसायटी, इमारत करून देतील. मात्र यासाठी आमदारांना इतरांप्रमाणे जो खर्च येणार आहे तो द्यावा लागणार आहे. इतरांना जशी घरं मिळतात तसेच ज्या आंमदारांना घरे नसतील तिथे अशा आमदारांना तिथे घरे मिळतील. पैसे देऊन इतरांप्रमाणे घरं मिळणार असतील तर त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
छगन भुजबळांचा विखेंना टोला
शिवसेना आणि राष्ट्रवादी नवरा-बायको आणि काँग्रेसचे वराडी असल्याचे खोचक टीका भाजपचे खासदार सुजय विखे यांनी केली आहे. यावर भुजबळांना विचारले असता भुजबळ म्हणाले की, तसं काही नसतं सगळ्यांना कल्पना आहे. मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे काम मुख्यमंत्र्याच्या शिवाय होत नाही .मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांना काय दिवस दूर राहावे लागले. तरीपण त्याचे अधिकारी त्यांच्यापासून ऑर्डर घेऊन काम करत होते. काँग्रेसचे पुढारी असो विरोधी पक्ष नेते या सर्वानाच योग्य मान दिला जातो. विखे यांना तिकडे मान मिळतो की नाही मला माहिती नसून पण आमच्याकडे होते त्यावेळेस ते विरोधी पक्षनेते होते असे भुजबळ म्हणाले.