मुख्यमंत्रीपदी प्रमोशन मिळावं असं वाटत नाही का? असं विचारताच अजितदादा म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील दिवसभरातील कार्यक्रम आटोपून आणि जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. (ajit pawar)

मुख्यमंत्रीपदी प्रमोशन मिळावं असं वाटत नाही का? असं विचारताच अजितदादा म्हणाले...
ajit pawar
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 5:55 PM

नाशिक: उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील दिवसभरातील कार्यक्रम आटोपून आणि जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणून प्रमोशन व्हावं असं वाटत नाही का? असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता ‘नाही वाटत’ असं उत्तर त्यांनी दिलं. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि पाच वर्षे तेच मुख्यमंत्री राहतील, असंही अजितदादांनी स्पष्ट केलं. (i don’t want promotion as a chief minister, says ajit pawar)

अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना परिस्थिती ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचवेळी त्यांना एका पत्रकाराने वेगळा प्रश्न विचारला. प्रत्येकाला बढती आणि प्रमोशनची अपेक्षा असते. तुम्हालाही उपमुख्यमंत्री राहून कंटाळा आला असेल. प्रमोशन व्हावं, मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का? असा सवाल अजितदादांना करण्यात आला. अनपेक्षितपणे आलेला हा प्रश्न अजितदादांनी तितक्याच सहजतेने टोलवून लावला. मला प्रमोशन व्हावं असं नाही वाटत, असं त्यांनी बिनदिक्कतपणे सांगितलं. बरं हे सांगतानाच आपल्या विधानाचं समर्थन करणारं उदाहरणही दिलं. तुम्हीही पत्रकार आहात. तुम्हालाही आपण संपादक व्हावं वाटतं. पण सर्वचजण संपादक होत नाही. एकच व्यक्ती संपादक होत असतो. आमच्याकडेही 145 मध्ये एकच माणूस मुख्यमंत्री होतो. तो आम्ही बसवलेला आहे. तोही पाच वर्षासाठी बसवला आहे. त्यामुळे पाच वर्षे याचा विचारच करायचा नाही, असं अजितदादांनी सांगताच एकच हशा पिकला.

पाच वर्षे सरकार टिकणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेऊन उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद दिलं आहे. हे तीन नेते सांगतील तोपर्यंत सरकार चालणार आहे. शरद पवारांनी पाच वर्षे सरकार टिकणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनीही पाच वर्षे सरकार टिकावं अशी सोनिया गांधीची इच्छा असल्याचं स्पष्ट केलं आहे. परंतु, मधून मधून सरकारमध्ये अस्वस्थता असल्याच्या वावड्या उठवल्या जातात. बातम्या सोडल्या जातात. त्या बिनबुडाच्या असतात. त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हा ज्याचा त्याचा प्रश्न

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी सारख्या संस्था आहेत, हे पूर्वी कुणाला माहीत नव्हतं. ही यंत्रणा देशातील सर्वच राज्यात आहेत. कोणी काय तक्रार करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं ते म्हणाले. (i don’t want promotion as a chief minister, says ajit pawar)

संबंधित बातम्या:

VIDEO: देशमुखांनंतर नागपुरचा दुसरा बडा नेता ईडीच्या रडारवर; राऊतांविरोधात ईडीकडे तक्रार

पडळकर म्हणाले, रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, आता रोहित पवारांचं जशास तसं उत्तर

शिवसेना-राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, नाईलाजाने काँग्रेसही स्वबळावर मैदानात!

(i don’t want promotion as a chief minister, says ajit pawar)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.