Nana Patole : दोस्ती असेल, तर सर्व गोष्टी विचारून केल्या पाहिजे, महाविकास आघाडीतील घडामोडींवर नाना पटोलेंनी ठेवले बोट
नाना पटोले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हणाले, आमचे मित्र एकनाथ शिंदे हे सभ्य आहे. पण असर दुसऱ्याचा लागला आहे. त्यामुळे दम द्यायची सवय तिकडून लागली. त्यांची महाशक्ती जी दिल्लीला बसली आहे.
नाशिकमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाविकास आघाडी समन्वय बैठकीसंदर्भात म्हणाले, मी आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आम्ही दोघे पद यात्रेत आहोत. काल बैठकीत अशोक चव्हाण गेले होते. 16 तारखेला महविकास आघाडीची समन्वय मीटिंग अपेक्षित आहे. महाविकास आघाडीबद्दल पटोले म्हणाले, दोस्ती असेल तर सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारून केल्या पाहिजे. आपल्या मताने सगळ्या गोष्टी करायच्या तर त्याला दोस्ती म्हणत नाही. ही महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीत निर्माण झाली. महाराष्ट्राच्या हितासाठी सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला होता. आमच्या सरकारमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम (Mini Program) होता. मला ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) पदाच्या राजीनामा द्यायला सांगितलं, तेव्हा मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगायला गेलो होतो. पण त्यांना फार्मालिटी पाळायची नसेल तर ठीक आहे. कोणावर जबरदस्ती नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री शिंदे सभ्य, पण, दम द्यायची सवई दिल्लीतून आली
नाना पटोले म्हणाले, काँग्रेस हा जनतेतला पक्ष आहे. मला पंकजा ताई यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पटोले मुंबई भाजप अध्यक्षांबद्दल सांगितलं की, टीव्हीवर वेगवेगळ्या अध्यक्ष नावांची चर्चा चालू आहे. कोण होत, काय होत ते बघू. कुणाला आताच का शुभेच्छा द्यायच्या. नाना पटोले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हणाले, आमचे मित्र एकनाथ शिंदे हे सभ्य आहे. पण असर दुसऱ्याचा लागला आहे. त्यामुळे दम द्यायची सवय तिकडून लागली. त्यांची महाशक्ती जी दिल्लीला बसली आहे. त्यांनी गुवाहाटी येथे सांगितलं होतं. त्या महाशक्तीचा असर त्यांच्याकडे आला, असं मला वाटतं.
महिलांना मंत्रिमंडळात स्थान नसणे दुर्दैवी
मंत्रिमंडळ विस्तारावर पटोले यांनी सांगितलं की, भाजपचे जे मूळ आहे, नाव घेत नाही. त्या मुळामध्ये महिलांना स्थान नाही. महिलांना मंत्रिमंडळात स्थान नाही, ही दुर्दैवी घटना आहे. भाजप स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त इव्हेंट साजरा करत आहे. मंत्री, आमदार, खासदार हे एक प्रकारे जनतेचे नोकर असतात. त्यामुळे जनतेच्या वेदना समजून त्यांना न्याय देता आला पाहिजे. पण रावसाहेब दानवे हे राजा असल्यासारखं वागतात. लोकशाहीत राजेशाही असत नाही. पण दानवे राजे आहेत. त्यांना इव्हेंट करायचा आहे. म्हणून लहान मुलांना पाण्यात भिजत ठेवलं आणि ते राजासारखे छत्रीत चालत होते. पण, जनता लक्ष ठेवत आहे, असंही त्यांनी सांगितलं.