नुकसान भरपाई मिळण्याआधीच ओढवलं दुसरं संकट; पेरलेलं अवकाळीनं सगळचं केलं जमिनदोस्त…

अवकाळी पावसाबरोबरच गारपीटीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.काल झालेल्या गारपीटीमुळे शेतातील पिकांमध्ये गारांचा खच पडला होता.

नुकसान भरपाई मिळण्याआधीच ओढवलं दुसरं संकट; पेरलेलं अवकाळीनं सगळचं केलं जमिनदोस्त...
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 3:36 PM

इगतपुरी/ नाशिक : मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काल रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी गारपिटीने इगतपुरी तालुक्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात काढणीला आलेला टोमॅटो, ज्वारी, कांदा ही पिके आता जमिनदोस्त झाली आहेत. आधीच कर्जाचा बोजा त्यानंतर अवकाळीचा तडाखा यामुळे उत्पादन खर्चदेखील निघणे आता मुश्किल झाले आहे. त्यातच झालेल्या गारपिटीमुळे पिके पावसात सापडल्याने पुन्हा एकदा अस्मानी संकटाने शेतकरीराजा भरडला गेला आहे.

आधीच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत, मात्र असता अजून त्या नुकसान भरपाईचे पैसेच भेटले नाहीत. त्यात पुन्हा एकदा अवकाळीचा मारामुळे जगावे कसे असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.

शासन जगू देईना पाऊस जगू देईना तर शेवटी आत्महत्याशिवाय पर्याय नसल्याचे शेनित येथील शेतकरी त्रंबक जाधव यांनी सांगितले.

या अवकाळी पावसाने प्रचंड मोठे नुकसान शेतीचे केले आहे. त्यामुळे आता शेतातील पिकांचे करायचे काय असा सवाल शेतकरी करत आहेत. एकीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवला आहे.

Igatpuri Rain

अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतात गारांचा खच साचला होता

तर आताही शेतात चांगले पीक आलेले असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Igatpuri

इगतपुरीमध्ये गारपीट झाल्यानंतर शेतीवर पडलेला गारांचे अच्छादन

अवकाळी पावसाबरोबरच गारपीटीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.काल झालेल्या गारपीटीमुळे शेतातील पिकांमध्ये गारांचा खच पडला होता. त्यामुळे या पिकांचे आता करणार काय अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.