सध्याचं सरकार हे मनुस्मृतीतील श्लोक शालेय शिक्षणात आणू पाहत आहे, याला आमचा कडाडून विरोध आहे, असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल महाड गाठलं. महाडच्या चवदार तळ्यावर त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. यावेळी त्यांनी मनस्मृतीच्या प्रति फाडल्या. तेव्हा आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पत्रक फाडल्या गेलं. मात्र आपल्याकडून ही कृती अनावधानाने झाली असल्याचं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी दिलं. पण या मुद्द्यावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या सगळ्यावर MIM ची भूमिका काय? खासदार इम्तियाज जलील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड आमचे राजकीय विरोधक असले तरी मला वाटतं की त्यांच्याकडून ते कृत्य नजर चुकीने झालं आहे. या प्रकरणाचा बाऊ केला जातो आहे. कारण त्यामागे राजकीय षडयंत्र आहे. शालेय पुस्तकात मनुस्मृतीतील विचारांचा धडा आणणं हे कितपत योग्य आहे?, असं जलील म्हणाले.
जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हापासून शाळेतल्या मुलांना देखील माहिती झाले की माझ्या शेजारचा कोणता जातीचा आहे. जातीपातींचे शिक्षण आपण अभ्यासक्रमात आणत आहोत हे दुर्दैवी आहे. आपण कोणतेही पक्षाचे असू द्या मात्र आपण या सर्वांनी एकत्र येऊन त्याचा विरोध करायला पाहिजे. जातीपातींचे राजकारण करणार तर आपली पिढी कुठे झाली याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
MIM चे नेते अब्दुल मलिक यांच्यावर काही दिवसांआधी गोळीबार झाला. त्यांनी इम्तियाज जलील यांनी भेट घेतली. तेव्हा मालेगावमध्ये एम आय एम पक्षासाठी तेव्हा अब्दुल मलिक आणि त्यांच्या भावाने खूप प्रयत्न केले होते. तेव्हाही आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. खूप विरोध झाला जे प्रस्थापित पक्ष होते त्यांच्याकडून खूप विरोध होता. आमच्यावर अनेक हल्ले देखील झाले होते. तरीही लोकांना एमआयएम पक्ष पाहिजे होता. निवडणूक काळात आम्हाला विरोध करण्यात आला निवडणूक लढू नका मात्र विरोध आल्यानंतर देखील आम्ही लढलो आणि जिंकलो, असंही इम्तियाज जलील म्हणाले.
महाराष्ट्रात विधानसभेला मालेगाव आणि धुळे या दोन आमच्या सीट आल्या होत्या आणि आमचे प्रमुख तेथे केंद्र झाले होते. औरंगाबाद नंतर धुळे आणि मालेगाव… मालेगाव मध्ये अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबाराची घटना झाली. त्यानंतर मला फोन आला आणि मी तात्काळ पोलिसांची बोललो त्यांनी सांगितलं आरोपींचा शोध लागला आहे, असंही इम्तियाज जलील यांनी सांगितलं.