देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. अशात भाजपने 400 चा नारा दिला आहे. यावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वात आधी अमित शाह राज्यात आले तेव्हा आमच्या छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांची सभा झाली. अमित शहा यांनी 45 जागा जिंकण्याचा नारा दिला होता . अमित शहा म्हणाले होते,औरंगाबाद से एम आय एम को उखाडकर फेकना है और कमल को खिलाना है…. आमचे इतरांशी वैचारिक मतभेद आहेत.पण महाराष्ट्रमध्ये त्यांनी सगळ्यात मोठी चूक केलेली आहे. मराठी लोकांमध्ये त्यांनी जे एक तेढ निर्माण केलेला आहे, हे भाजपने केलं आहे. हे सर्वात मोठे पाप भाजपने महाराष्ट्रात केलेलं आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले.
आता आम्हालाही बघायला मिळत आहे. अनेक लोक हे उद्धव ठाकरेंसोबत गेले आहेत. काँग्रेस सोबत गेले नाही. भाजपने स्वतःच्या स्वार्थासाठी काकाला पुतण्यापासून तोडले पुतण्याला आपल्या सोबत घेतले आणि राजकारण सुरू केलंय. शिवसेनेत फूट पाडण्याचे काम देखील भाजपने केलं आहे. मात्र लोक आता हुशार झाले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर देशात काय होईल माहित नाही. पण महाराष्ट्रात आपल्याला नक्कीच वेगळे चित्र पाहायला मिळेल, असं जलील म्हणाले.
माझ्या शहरात ज्याला 200 मते मिळतील. तो देखील आता बोलतोय की मी जिंकणार आहे. भाजपच्या राज्यातील अध्यक्षांनी 46 जागा जिंकू असे सांगितले होतं. पण अमित शाह यांनी 45 जागा जिंकू असणारा दिला होता. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आम्ही 41 जागा जिंकू… भाजपने जे काही दावे केले. त्यातील 50% तरी त्यांनी जागा जिंकल्या तर त्यांनी खूप काही समाधान मानावं लागेल, असं इम्जियाज जलील यांनी म्हटलं आहे.
भारतातला सर्वात मोठा जल्लोष छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल. मी सर्वांना त्यासाठी आमंत्रण देतो. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक निवडणुकीत उभे राहतात. निवडणुकीतील सुधारणा होत नाही तोपर्यंत असेच सुरू राहील. रिक्षा चालवणारा आज कोट्यावधीत रुपयाचा मालक आहे. असा कोणता बिजनेस आहे की त्यासाठी इतका मोठा नफा होतो. पॉलिटिकल फिल्ड ही एकमेव अशी आहे की जिथे पाच वर्षात 500- 700 कोटींनी उत्पादनात वाढ होते. निवडणुकीत सुधारणा नरेंद्र मोदी आणणार नाहीत. कारण त्यांच्यातीलच 300 खासदार हे बाजूला जातील. जोपर्यंत देशात निवडणुकीत सुधारणा होणार नाही तोपर्यंत काहीही बदला होणार नाही असं वाटतं, असं मतही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं आहे.