Malegaon Murder | मालेगावात किरकोळ वादातून एकाची हत्या, आझाद नगर भागातील धक्कादायक घटना, परिसरात भीतीचं वातावरण
दोन दिवसांत शहरात दुसरा खून झालायं. मागील भांडणात झालेले वाद मिटविण्यासाठी जमलेल्या मित्रांच्या बैठकीतच एका तरुणावर जमावाने तलवारीने हल्ला करून त्याला जागीच ठार मारल्याची धक्कादायक घटना घडलीयं.
मालेगाव : मालेगाव (Malegaon) शहरात खुनांचे सत्र सुरूच आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. शहरातील सततच्या खुनाच्या (Murder) घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक दहशतीखाली राहत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या घटनांनी मालेगावात पोलिसांच्या कार्यक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातंय. अगदी छोट्या छोट्या कारणांवरून मालेगावात खुन केला जातोयं. गुन्हेगारांना पोलिसांच्या (Police) धाकच राहिला नसल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांना केलायं.
दोन दिवसात मालेगावात दोन खुनाच्या वेगवेगळ्या घटना
दोन दिवसांत शहरात दुसरा खून झालायं. मागील भांडणात झालेले वाद मिटविण्यासाठी जमलेल्या मित्रांच्या बैठकीतच एका तरुणावर जमावाने तलवारीने हल्ला करून त्याला जागीच ठार मारल्याची धक्कादायक घटना घडलीयं. मालेगाव शहरात मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास तरूणाची हत्या करण्यात आली. मोहम्मद इब्राहिम समसुदोहा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जुना वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरूणावर टोळक्याने केला तलवारीने हल्ला
मागील भांडणात झालेला वाद मिटवण्यासाठी मोहम्मद इब्राहिम समसुदोहा हा तरूण गेला होता. मात्र, त्याच्यावर तेथील जमावाने तलवारीने हल्ला केल्याने तरूणाचा जागीच जीव गेला. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलायं. मात्र, अगदी शुल्क कारणांवरून मालेगावात खुन केले जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळते आहे.