नाशिक : पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांचे महत्वपूर्ण आदेश (Order) दिले असून 3 मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची (Loudspeaker) परवानगी घ्यावी लागणार आहे. अन्यथा 3 मे नंतर थेट कारवाई करून भोंगे काढणार असल्याचं आदेशात म्हटलंय. मुस्लिम धर्मियांना देखील भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर हनुमान चालीसा लावायची असल्यासही पोलीस (P0lice) आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे. अजान पूर्वीं 15 मिनिटं आणि 100 मिटर लांब हनुमान चालीसा लावता येईल. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार धार्मिक स्थळी कोणत्याही कार्यक्रमासाठी भोंगे लावायचे असल्यास परवानगी आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा, असे आदेश मनसैनिकांना दिले होते. त्यानंतर राज्यभरात मनसैनिकांनी मशिदसमोर भोंगे लावले होते. तर काही ठिकाणी प्रशासनाने हस्तक्षेप करत मनसैनिकांना रोखलं, नाशकात मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा इफेक्ट दिसून आल्याचं बोललं जातंय.
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याचे आव्हान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्याचा पुनरुच्चार उत्तर सभेतदेखील त्यांनी केला होता. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मशिदीसमोर भोंगे लावल्याचं दिसून आलं.
राज ठाकरे यांचा प्रदेशिक पक्ष असलेल्या मनसेची एकेकाळी नाशकात सत्ता होती. त्याच नाशकात त्यांच्या आदेशाची अंमलबजावनी झाल्याचं बोललं जातंय. नाशकात पोलीस आयुक्त पोलीस दीपक पांडेय यांनी महत्वपूर्ण आदेश दिले असून 3 मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. अन्यथा 3 मे नंतर थेट कारवाई करून भोंगे काढणार आहे. मुस्लिम धर्मियांना देखील भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे. अजान पूर्वीं 15 मिनिटं आणि 100 मिटर लांब हनुमान चालीसा लावता येईल. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार धार्मिक स्थळी कोणत्याही कार्यक्रमासाठी भोंगे लावायचे असल्यास परवानगी आवश्यक आहे.
इतर बातम्या
वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात, सहाजण ठार तर चारजण जखमी; जखमींची प्रकृती चिंताजनक
दिलासादायक! पंतप्रधान मोदींच्या काळात गरीबीचे प्रमाण कमी होण्याचा दर वाढला; जागतिक बँकेची माहिती
Health Care : या गोष्टी रात्री पाण्यात भिजत ठेवा, सकाळी उपाशी पोटी खा आणि निरोगी आयुष्य जगा!