Nashik : आंतरजातीय विवाह केल्यानं शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही! नाशिकमध्ये जातपंचायतीने लिहून घेतले मुलीकडून पत्र
आदिवासी ठाकर समाजाला हे पत्र लिहून देण्यात आलंय. मुलगी मोनाली (नाव बदललेलं) हिनं आंतरजातीय विवाह केला. मोनाली ही अनुसूचीत जमातीची मुलगी आहे. मुलगा अनुसूचीत जातीचा आहे.
नाशिक : आंतरजातीय विवाहामुळे सवलती बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आंतरजातीय विवाह केल्यानं यापुढे अनुसूचित जमातीच्या योजनांचा लाभ घेणार नाही, असं पत्र मुलीकडून लिहून (letter from girl) घेतलं. पत्रावर सरपंचासह इतर लोकांचे सही आणि शिक्के आहेत. दोन्ही समाजाच्या लोकांसमोर पत्र लिहून घेतले. इगतपुरी तालुक्यातील रायांबे गावात हा धक्कादायक प्रकार घडला. सरपंचांसह जातपंचायतीवर कारवाईची मागणी अंनिस आणि सामाजिक संघटनांनी (social organization) केली आहे. जातपंचायतीविरोधात रोष व्यक्त केला जातोय. एकीकडं शासन आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देते तर, दुसरीकडं जातपंचायती (Jat Panchayat) अशाप्रकारे हुकुमशाही पद्धतीचा वापर केला जातोय. त्यामुळं संताप व्यक्त केला जातोय.
रायांबे ग्रामपंचायतीतील प्रकार
आदिवासी ठाकर समाजाला हे पत्र लिहून देण्यात आलंय. मुलगी मोनाली (नाव बदललेलं) हिनं आंतरजातीय विवाह केला. मोनाली ही अनुसूचीत जमातीची मुलगी आहे. मुलगा अनुसूचीत जातीचा आहे. आदिवासी समाजाच्या रुढी परंपरेला यामुळं धक्का बसला. पाच मे रोजी मोनालीनं अनुसूचीत जातीच्या मुलासोबत विवाह केला. त्यामुळं यापुढं अनुसूचीत जमातीच्या (आदिवासी ठाकूर) कुठल्याही शासकीय, निमशासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही, असं मोनालीनं लिहून दिलंय. ही घटना नाशिक जिल्ह्यातल्या रायांबे ग्रामपंचायतीत घडली.
अनुसूचित जमातीच्या सर्व सवलती बंद
अनुसूचित जमातीला शासनानं काही सवलती दिल्या आहेत. या शासकीय सवलती मला नकोत. कारण मी जातीबाहेर जाऊन लग्न केलं. असं या मुलीकडून लिहून घेण्यात आलं. मुलीनंही स्वतःच्या मनानं वर निवडला. जातीबाहेर जाऊन लग्न केलं. त्यामुळं आदिवासी ठाकूर जातीला मिळणाऱ्या सवलती घेणार नाही, असं लिहून दिलं. याला आथा विरोध होताना दिसतोय. सरपंच, सदस्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडं करण्यात आली.
हे आहेत लिहून घेणार
आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पांडू पारधी, आदिवासी समाजसेवक कृष्णा गोहिरे, भले सोमनाथ, सोंगाळ चिमा, कुमार भगत, प्रकाश पोकळे, लालचंद भले, उत्तर वाक, प्रकाश पिंगळे, सरपंच शिवाजी पिंगळे, सुनंदा पिंगळे यांनी हे लिहून घेतले. विशेष म्हणजे या पत्रावर रायांबे ग्रामपंचायतीचा शिक्का व सरपंचाची सही आहे.