Video | खासदार संभाजीराजेंच्या गाडीचं स्टेअरींग महिलेच्या हाती! Viral व्हिडीओमागचा इंटरेस्टिंग किस्सा

Sambhaji Raje Bhosale Viral Video of Car : नाशिकरोड हून देवळाळी कॅम्पच्या (Nashik Road to Devlali Camp) परिसरात राज असतेवेळी संभाजीराजेंच्या गाडीचं सारथ्य एका महिलेनं केलं. यावेळी संभाजीराजे हे देखील या पुढेच बसले होते.

Video | खासदार संभाजीराजेंच्या गाडीचं स्टेअरींग महिलेच्या हाती! Viral व्हिडीओमागचा इंटरेस्टिंग किस्सा
संभाजी राजेंच्या गाडीचं सारथ्य करणारी ती महिला कोण? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 8:54 PM

नाशिक : खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांच्या गाडीचं सारथ्य एक महिला करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ नाशिकमधील असून ही महिला नेमकी कोण आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला खासदार संभाजीराजे हे नाशकात दाखल झाले होते. नाशिकरोड हून देवळाळी कॅम्पच्या (Nashik Road to Devlali Camp) परिसरात राज असतेवेळी संभाजीराजेंच्या गाडीचं सारथ्य एका महिलेनं केलं. यावेळी संभाजीराजे हे देखील या पुढेच बसलेले असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. संभाजीराजेंचे फोटो काढण्यासाठी यावेळी आजूबाजूला तोबा गर्दी जमली होती. याचवेळी एका महिला संभाजी राजेंची गाडी चालवत असल्याचं दिसून आल्यामुळे अनेकांना नवल वाटलं. हा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला असून ही महिला नेमकी कोण होती, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

व्हायरल व्हिडीओ कधीचा?

हा व्हिडीओ आहे, 18 फेब्रुवारी रोजीचा. नाशिकमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. उपस्थितांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. खासदार संभाजी राजे हे खासदार हेमंत गोडसे यांच्या घरी भेट द्यायला जाणार होते. त्यावेळी त्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी एक गाडी संभाजी राजेंना रिसीव्ह करण्यासाठी हेमंत गोडसे यांनी पाठवली होती. स्वतः हेमंत गोडसे हे दिल्लीत असल्यामुळे त्यांना संभाजी राजेंना आणायला जाणं अशक्य होतं. त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी आपल्या सूनेवर टाकली. हेमंत गोडसे यांनी सून भक्ती गोडसे या गाडी घेऊन संभाजीराजे भोसले यांना घेण्यासाठी रवाना झाल्या.

हेमंत गोडसे यांची सून आपल्याला रीसिव्ह करायला आली आहे, हे पाहून संभाजी राजेंनाही नवल वाटलं. यावेळी हेमंत गोडसे यांची सून भक्ती गोडसे यांनी मी तुमची गाडी चालवू का, असा प्रश्न केला. तेव्हा संभाजीराजेंनीही परवानगी देत आपल्या गाडीचं सारथ्य भक्ती गोडसे यांना करायला दिलं. नेहमीपेक्षा काहीसं वेगळं चित्र दिसल्यानं हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेकांनी लगबग सुरु होती.

ड्रायव्हिंगची स्तुती

भक्ती गोडसे संभाजी राजे यांच्या गाडीचं सारथ्य करतानाचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. यावेळी संभाजी राजे यांनी भक्ती यांची विचारपूस केली. त्यांच्या ड्रायव्हिंगची स्तुतीदेखील केली. नाशिक रोडपासून ते देवळाली कॅम्प पर्यंतचा हा प्रवास पाहण्यासाठी अनेकांनी गर्दीदेखील केली होती. नाशिक शहरात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला उत्सव सोहळ्याला भेट देण्यासाठी आले असता हा किस्सा घडला.

पाहा व्हिडीओ –

तृप्तीनंतर भक्तीची चर्चा!

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या गाडीचंही सारथ्य एका महिलेनं केलं होतं. तेव्हा देखील अशीच चर्चा झाली होती. 26 डिसेंबर रोजी कोकण दोऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचं सारथ्य तृप्ती मुळीक यांनी केलं होतं. महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करून त्यांच्या सक्षमीकरणाचा शरद पवार यांचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार हे समर्थपणे पुढे नेत असल्याचे यातून दिसून आलं होतं.

बेधडक अजितदादांच्या गाडीचे स्टेरिंग एका महिलेच्या हातात बघून सर्वांनाच कौतुक वाटले. उपमुख्यमंत्र्यांची गाडी सुसाट चालवणाऱ्या या रणरागिणीने या दौऱ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. तृप्ती मुळीक यांच्यानंतर आता भक्ती गोडसे यांनी संभाजीराजेंच्या गाडीचं सारथ्य केल्यानं अनेकांना कौतुक वाटलंय.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

Modi | अफगाण पगडी घालून मोदींची अफगणिस्तानातील शीख आणि हिंदू शिष्टमंडळासोबत चर्चा

Video : राज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कसा कोसळला? स्टेज कोसळल्यावर काय झालं? पाहा नवा Video

VIDEO: पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा उघड करणार; संजय राऊत कडाडले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.