बिबट्याकडून मांजरीचा पाठलाग, धावाधाव सुरु असताना दोघेही विहिरीत पडले आणि सर्व संपलं

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकरी हेमंत मोरे यांच्या गट क्रमांक 799 मधील शेतामध्ये असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या आणि मांजर मृतावस्थेत आढळले आहेत.

बिबट्याकडून मांजरीचा पाठलाग, धावाधाव सुरु असताना दोघेही विहिरीत पडले आणि सर्व संपलं
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 7:42 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्हामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकरी हेमंत मोरे यांच्या गट क्रमांक 799 मधील शेतामध्ये असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या आणि मांजर (Leopard and cat) मृतावस्थेत आढळले आहेत. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे आणि बिबट्याचा वावर होत असल्यामुळे गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निफाड तालुक्यातील कोकणगावमधील घटना

विहिरीमध्ये बिबट्या आणि मांजर मृतावस्थेत पडलेले असल्याची माहिती गावामध्ये पसरली. त्यानंतर कोकणगावचे सरपंच जगन्नाथ मोरे यांनी चांदवड वन विभागाचे वन परिक्षेत्राचे अधिकारी संजय वाघमारे यांना ही माहीती दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याचे वय साधारण वर्ष तीन असल्याचे सांगितले जाते आहे.

बिबट्या आणि मांजरीचा मृत्यू

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मादी जातीच्या मृत बिबट्या आणि मांजरीला विहिरीबाहेर काढले. सावजाच्या शोधात मांजर दिसल्याने हा बिबट्या मांजरीचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला. पाणी जास्त असल्याने बराच काळ विहिरीत राहिल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला. मात्र, मृत्यू कशामुळे झाला यासाठी ओझर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर बिबट्या आणि मांजरेवर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

संबंधित बातम्या : 

Corona infection in students at MIT Pune| पुण्यातील एमआयटी शैक्षाणिक संस्थेतील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

पुण्यातील विवाहितेची अल्पवयीन लेकीसह आत्महत्या, 29 वर्षांनंतर पतीला तुरुंगवास

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.