नाशकात बिबट्याचा धुमाकूळ, 13 बकऱ्यांचा फडशा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात बिबट्याचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. अमझर येथील शेतकरी चिंतामण वाघमारे यांच्या 13 बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (leopard Attcked 13 Goat death in nashik Surgana)

नाशकात बिबट्याचा धुमाकूळ, 13 बकऱ्यांचा फडशा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
अमझर येथील शेतकरी चिंतामण वाघमारे यांच्या 13 बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 10:10 AM

नाशिक : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात बिबट्याचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. अमझर येथील शेतकरी चिंतामण वाघमारे यांच्या 13 बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (leopard Attcked 13 Goat death in nashik Surgana)

बिबट्याच्या हल्ल्यात 13 बकऱ्यांचा मृत्यू

गावानजीकच बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला चढवला. त्या हल्ल्यात 13 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गावानजीक जंगल परिसर असल्याने बिबट्याचा सतत वावर आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. परिसरात वनविभागाने पिंजरा लावण्याची ग्रामस्थांनी मागणी केलीये.

नाशिक आणि लगतच्या तालुक्यात बिबट्यांचा सऱ्हास वावर

नाशिक शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये बिबट्याचा बारमाही वावर असल्याचं पाहायला मिळतं. हरएक महिन्यात बिबट्याने हल्ला केल्याच्या बातम्या येतात. लोकवस्तीवर बिबट्याचा वावर वाढल्याचं पाहायला मिळतं. आता नागरिक त्रस्त झाले असून वन विभागाने आश्वासक पाऊल उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत.

गेल्याच महिन्यात अश्विननगरमध्ये बिबट्याचं दर्शन

सिडको मधील अश्विन नगर परिसरात गेल्या महिन्यात बिबट्याचं दर्शन झालं होतं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होतं. रात्रीच्या वेळी तिथून एक नागरिक गाडीवरून जात होता. त्यावेळी त्याला बिबट्या दिसल्याने त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याचा अपघात झाला. 5 मे रोजी ही घटना घडली होती. दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. (leopard Attcked 13 Goat death in nashik Surgana)

हे ही वाचा :

नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत, सिडकोच्या अश्विन नगरमध्ये बिबट्या शिरला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.