Nashik Oxygen Tank Leak Patients Names | नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संपूर्ण यादी

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवार (21 एप्रिल) दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला.  (List of Patients died in Nashik Oxygen Leak)

Nashik Oxygen Tank Leak Patients Names | नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संपूर्ण यादी
नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 10:37 AM

नाशिक : नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात (Nashik Zakir Hussain hospital) ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे ऑक्सिजनअभावी तब्बल 22 कोरोनाग्रस्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश आहे. या दुर्दैवी अपघातात प्राण गमवावे लागलेल्या रुग्णांची संपूर्ण यादी समोर आली आहे. 33 वर्षांच्या तरुणापासून 74 वर्षीय वृद्धापर्यंत विविध वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. (List of Patients died in Dr Zakir Hussain Hospital Nashik Oxygen Leak)

डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची नावे

अमरदीप नगराळे – वय 74 भारती निकम – वय 44 श्रावण पाटील – वय 67 मोहना खैरनार – वय 60 मंशी शहा – वय 36 पंढरीनाथ नेरकर – वय 37 सुनील झाळके – वय 33 सलमा शेख – वय 59 प्रमोद वालुकर – वय 45 आशा शर्मा – वय 45 भय्या सय्यद – वय 45 प्रविण महाले – वय 34 सुगंधाबाई थोरात – वय 65 हरणाबाई त्रिभुवन – वय 65 रजनी काळे – वय 61 गीता वाघचौरे – वय 50 बापुसाहेब घोटेकर – वय 61 वत्सलाबाई सुर्यवंशी – वय 70 नारायण इरनक – वय 73 संदीप लोखंडे – वय 37 बुधा गोतरणे – वय 69 वैशाली राऊत – वय 46

नाशिकमध्ये नेमके काय घडले ?

नाशिक शहरात महापालिकेचे डॉ. झाकीर हुसैन रुग्णालय आहे. ऑक्सिजनचा अनियमित पुरवठा आणि कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे हे रुग्णालय नेहमीच चर्चेत राहिलं आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवार (21 एप्रिल) दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला.

रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकमधून गळती झाल्याने हजारो लीटर लिक्वीड स्वरुपातील ऑक्सिजन वाया गेले. यावेळी रुग्णालयात अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील 150 जण व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन लीक झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांपैकी 22 जणांचा तडफडून मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळं नोझल तुटून ही ऑक्सिजन गळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दीड तासांनी गळती रोखण्यास यश

झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी अथक प्रयत्न सुरु होते. जवळपास एक ते दीड तासानंतर ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला यश आले. या हलगर्जीमुळे तब्बल 22 रुग्णांना नाहक जीव गमवावा लागला. तर रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या इतर रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये  

नाशिक दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

पाहा स्पेशल रिपोर्ट :

संबंधित बातम्या :

Nashik Oxygen Tank Leak | नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव, 22 जणांचा गुदमरुन मृत्यू, नेमकं काय घडलं?

‘माझी मम्मी क्लीअर झालेली, ऑक्सिजन संपला, फडफड कोंबडीवाणी मेली ती’, झाकीर रुग्णालयाबाहेर महिलेचा आक्रोश

(List of Patients died in Dr Zakir Hussain Hospital Nashik Oxygen Leak)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.