Loadshedding : ऊर्जा राज्यमंत्री तनपुरेंनाच लोडशेडिंगचा फटका; कार्यक्रमात बत्ती गुल, संकटासाठी केंद्राला लावला बोल!
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) तावाताने बोलत होते. राज्यातल्या भारनियमनाच्या (Loadshedding) संकटाला तत्कालीन फडणवीस सरकार आणि सध्याच्या केंद्र सरकारला जबाबदार धरत होते. केंद्राने कोळसा पुरवठा केला, तर असाच प्रश्नच उदभवला नसता, अशी टीकेची तोफडही डागत होते. मात्र, अचानक याचवेळी कार्यक्रमातली बत्ती गुल झाली.
नाशिकः ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) तावाताने बोलत होते. राज्यातल्या भारनियमनाच्या (Loadshedding) संकटाला तत्कालीन फडणवीस सरकार आणि सध्याच्या केंद्र सरकारला जबाबदार धरत होते. केंद्राने कोळसा पुरवठा केला, तर असाच प्रश्नच उदभवला नसता, अशी टीकेची तोफडही डागत होते. मात्र, अचानक याचवेळी कार्यक्रमातली बत्ती गुल झाली. त्यामुळे अधिकाऱ्यांची हवा मात्र टाइट झाली. हा सारा प्रकार नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये घडला. येथे एका क्लिनीकच्या उदघाटनासाठी तनपुरे यांनी हजेरी लावली आणि हा प्रकार घडला. दरम्यान, तनपुरे येवला दौऱ्यावरही होते. येथे त्यांनी शासकीय विश्रामगृहावर विश्रांती घेतली. यावेळी पत्रकारांशीही त्यांनी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रवर आलेल्या ऊर्जा संकटाला हे महाविकास आघाडीला जबाबदार धरले आहे. याप्रकरणी राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केलीय. यावर प्रश्न विचारला असता तनपुरे म्हणाले की, आंबेडकर साहेबांचा मी आदर करतो, पण त्यानी जरा संपूर्ण माहिती घेऊन यावर खरे बोलणे अपेक्षित आहे.
देशभर कोळशाचा तुटवडा
तनपुरे म्हणाले की, हे फक्त महाराष्ट्रावरती आलेले संकट नाही. सध्या देशभरात सगळीकडे कोळशाचा तुटवडा आहे. याचा पुरवठा केंद्राकडून होतो. त्यामुळे सध्या महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा अगदी उत्तर प्रदेश सगळीकडे लोडशेडिंग मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. फक्त महाराष्ट्र शासनाला दोष देण्यापेक्षा केंद्र शासनाने कोळशाचे नियोजन केले, तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये हे संकट टळेल. त्यामुळे आंबेडकर साहेबांचा मी आदर करतो पण त्यांनी संपूर्ण माहिती खोलात घेऊन जर बोलले असते तर अधिक बरे झाले असते.
केंद्र कसे जबाबदार?
तनपुरे म्हणाले की, केंद्र कसे जबाबदार आहे, याची खरी आकडेवारी देखील देऊ शकतो. आज जेवढा कोळसा आपले महानिर्मितीच्या प्लँटला लागतो. त्याच्या पेक्षा कमी कोळसा आहे. पावसाळ्यामध्ये कोळशाचा स्टॉक जास्त प्रमाणात जास्त करावा लागतो. दोन दोन महिने पुरेल एवढाच कोळसा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साठवावे लागतो, पण तसे होताना दिसत नाहीये. त्यामुळे कदाचित हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा नंतर आणखी गडद देखील होऊ शकतो. या संकटासाठी फक्त केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनावर करण्यापेक्षा आधी कोळशाचा योग्य पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!