कांद्याचे वांदे थांबता थांबेनात; बळीराजाचं संकट दूर होणार कधी…
काहीतरी शेतात वेगळे करूया 1 लाख रुपये कर्ज घेत टोमॅटोचे पीक घेतले गेले. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जोमदार आलेले टोमॅटोचेही पीकही आता भुईसपाट झाले आहे.
लासलगाप/नाशिक : कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा बाजार भाव कोसळल्याने चांगलेच वांदे झाले आहेत. कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव जवळील वाकी खुर्द येथील संतोष देवडे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लाल कांद्याला बाजारभाव नसल्याने कांदा तोट्यात विक्री करावा लागला आहे,
तर टोमॅटोतून काहीतरी भेटेल म्हमून त्यांनी टोमॅटोचेही पीक घेतले होते पण वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे उभ्या टोमॅटो पिकाचा लाल चिखल झाल आहे.
लासलगाव जवळील वाकी खुर्द येथील शेतकरी संतोष देवडे यांची दोन एकर शेती असून एक एकर शेतात 60 ते 70 हजार रुपये खर्च करत लाल कांद्याचे पीक घेतले होते.
शेतातील हे पीकही जोमदार आले होते. कांदा काढणीला सुरुवात झाली, मात्र त्यानंतर कांद्याचे बाजार भाव दररोज कोसळण्यास सुरुवात झाली.
या बाजारभावाचा परिणाम शेतकऱ्यांचा साधा मजूरीचाही खर्च निघला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. वाहतूक आणि शेतातून कांदा काढणी याचा विचार केला तर एक लाख रुपयांपर्यंत खर्च गेला होता,
तर हातात मात्र 50 हजार रुपये 50 हजार रुपये तोट्यात अशी परिस्थिती होती. त्यामुळे लाल कांदा विक्री केला गेला तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा घेतलेले कर्ज कसे फेडावे, मुलांचे शिक्षण कसे करावे या विवंचनेत असल्याचे पत्नी शैला यांनी सांगितले.
काहीतरी शेतात वेगळे करूया 1 लाख रुपये कर्ज घेत टोमॅटोचे पीक घेतले गेले. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जोमदार आलेले टोमॅटोचेही पीकही आता भुईसपाट झाले आहे.
त्यामुळे मोठे नुकसान झाले होते. या संकटामुळे आता काय करावा असा मोठा प्रश्न आता देवडे कुटुंबीयांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या संकटाकडे लक्ष देण्याची गरज आहे असं आता हे देवडे कुटुंबीय सांगत आहेत.