VIDEO: कावळ्यांची पिसं झडून जातील, चोची मारून मारून तुटून जातील, पण सरकार कोसळणार नाही; राऊतांचा भाजपला खोचक टोला
कावळ्यांची पिसं झडून जातील, चोची मारून मारून... चोची तुटून जातील. मात्र हे सरकार काही पडणार नाही, असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. (Maharashtra government won't break even if Army is deployed, says sanjay raut)
नाशिक: सरकार पाडण्याच्या वल्गनेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा असं सांगतानाच कावळ्यांची पिसं झडून जातील, चोची मारून मारून… चोची तुटून जातील. मात्र हे सरकार काही पडणार नाही, असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा टोला लगावला. डोमकावळे कितीही फडफडले तरी त्यांना काही महाविकास आघाडी सरकार पाडण्याची सुपारी फोडता येणार नाही. मी माझ्या पक्षासाठी कोणतेही घाव झेलण्यास तयार आहे. महाविकास सरकार आणण्यासाठी खूप खटपटी, लटपटी केल्या, त्याला यश आलं. पुलोदनंतर प्रथमच महाराष्ट्रात असा प्रयोग घडला. पुलोदचे शिल्पकार शरद पवार आपल्यासोबत आहेत. शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना भक्कम पाठिंबा, असं सांगतानाच ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा. अनेक वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत, असं राऊत म्हणाले.
बाबरी तोडली तेव्हा काखा वकर गेल्या नाही
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आजच्या सामनातील अग्रलेखावरुन संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. शेलारांच्या टीकेला राऊतांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. ‘आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरुष, मुळ पुरुष आहोत आम्हाला कसं काय कुणी शिकवून चालेल. बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, पळून नाही गेलो. तुम्हीच पळून गेलात. काश्मिर खोऱ्यात जे हिंदुंचं हत्याकांड सुरु आहे. बांग्लादेशात जे हिंदुंच्या वस्त्यांवर हल्ले होत आहेत, त्यांची घरं जाळली जात आहेत, त्यांच्या हत्या होत आहेत. त्या हिंदुंना संरक्षण देण्याबाबत आजच्या सामनातील अग्रलेखात प्रश्न उपस्थित केलाय’, असं राऊत म्हणाले.
हिंदूंचं संरक्षण हे केंद्राचं काम
‘देशाबाहेरील हिंदू असेल किंवा काश्मिरमधील हिंदू असेल, त्यांचं संरक्षण करणं हे केंद्र सरकारचं काम आहे, असं म्हणणं हे काय दारिद्र्य झालं का? असं तर कुणी म्हणत असेल तर मला दारिद्र्याची व्याख्या समजून घ्यायला हवी. आम्ही म्हणतोय हिंदुंचं रक्षण करा, आम्ही म्हणतोय बांग्लादेशातील हिंदुंना संरक्षण द्या. मोदी सरकारनं बांग्लादेशवर दबाव आणला पाहिजे. भाजपचे खासदार स्वामी असं म्हणतात कि हिंदुस्तानने हिंदुंच्या विषयावर बांगलादेशशी युद्ध केलं पाहिजे, मग यावर मिस्टर शेलार काय म्हणतात? काश्मिर खोऱ्यात मागील 17 दिवसांत हिंदू आणि शिखांच्या एकूण 21 हत्या झाल्या. तर 19 पोलिस आणि जवान मारले गेले आहेत. मग हा प्रश्न विचारणं हे दारिद्र्य झालं का?’ असा सवालही राऊत यांनी विचारलाय.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 23 October 2021 https://t.co/tMTS4JvFy2 #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 23, 2021
संबंधित बातम्या:
सोमय्या म्हणाले, राऊत कुणाचे प्रवक्ते, पवारांचे की ठाकरेंचे? आता राऊत म्हणाले, हा तर मोदींचा अपमान
VIDEO: मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव असेल तर त्याविरोधात भाजप आंदोलन करेल; आशिष शेलार यांचा टोला
हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा ! सरकारी परिपत्रकात औरंगाबादचं संभाजीनगर होताच इम्तियाज जलील भडकले
(Maharashtra government won’t break even if Army is deployed, says sanjay raut)