VIDEO | सासऱ्यांच्या समाधीस्थळी डॉ. भारती पवार भावूक, सासूबाईंनी मिठी मारताच रडू कोसळले

सासरे ए टी पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करुन श्रद्धांजली वाहताना डॉ. भारती पवार भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. सासूबाई गळ्यात पडताच त्यांना रडू कोसळले.

VIDEO | सासऱ्यांच्या समाधीस्थळी डॉ. भारती पवार भावूक, सासूबाईंनी मिठी मारताच रडू कोसळले
सासऱ्यांच्या समाधीस्थळी डॉ. भारती पवार भावूक
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 9:00 AM

नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) सासऱ्यांच्या समाधीस्थळी भावूक झाल्या. श्रद्धांजली वाहताना सासूबाईंनी मिठी मारताच भारती पवारांना रडू कोसळले. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या समारोपानंतर कळवणमध्ये असलेल्या माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या समाधी स्थळाचे त्यांनी दर्शन घेतले.

पालघरमधून सुरु झालेल्या डॉ. भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा धुळ्याला समारोप झाला. त्यानंतर शनिवारी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील दळवट येथे सासरे आणि माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतले. सासऱ्यांना अभिवादन करुन श्रद्धांजली वाहताना डॉ. भारती पवार भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. सासूबाई गळ्यात पडताच त्यांना रडू कोसळले. यावेळी उपस्थित नातेवाई आणि कार्यकर्त्यांना देखील अश्रू अनावर झाले होते.

कोण आहेत भारती पवार?

भारती पवार या माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्तीय ए टी पवार यांच्या स्नुषा आहेत. भारती पवार यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून ग्रामीण भागात अनेक वर्षे काम केले आहे. त्या सुरुवातीपासूनच अभ्यासू नेत्या म्हणून ओळखल्या जातात. जिल्हा परिषद सदस्य म्हणून भारती पवार यांनी कुपोषणाच्या समस्येवर काम केले होते. या काळात त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला चांगलेच धारेवर धरले होते. अभ्यासू वृत्ती आणि संघटन कौशल्याच्या जोरावर भारती पवार यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री, जाणून घ्या डॉ. भारती पवारांचा राजकीय प्रवास

VIDEO | केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा आदिवासी बांधवांसह लोकनृत्यावर ठेका

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.