Nashik : आरोग्य विज्ञान विद्यापीठाची पुण्यात जेनेटिक लॅब; कॅन्सर उपचाराला मिळणार चालना, विविध कोर्स होणार सुरू

कुलगुरू कानिटकर म्हणाल्या की, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पुणे येथील विभागीय केंद्र विस्तारीत करणे तसेच डिपार्टमेंट ऑफ जेनेटिक्स, इम्युनॉलॉजी, बायोकेमिस्ट्री अँड न्युट्रिशन विभागाच्या अंतर्गत जेनेटिक आणि मॉलीक्युलर बायोलॉजी विषयात अधिक संशोधन व्हावे याकरिता स्वर्गीय डॉ. के.सी. घारपुरे यांच्या नावाने ही प्रयोगशाळा संचलित करण्यात येणार आहे. भारतीय औषध संशोधन संस्थेच्या सहकार्याने शिक्षण, संशोधन, प्रभावी प्रात्यक्षिके आदींचा विस्तार करण्यात मदत होणार आहे.

Nashik : आरोग्य विज्ञान विद्यापीठाची पुण्यात जेनेटिक लॅब; कॅन्सर उपचाराला मिळणार चालना, विविध कोर्स होणार सुरू
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने भारतीय औषध संशोधन संस्थेसमवेत सामंजस्य करार केला आहे.
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 12:23 PM

नाशिकः जेनेटिक लॅबच्या (Genetic Lab) माध्यमातून समाजोपयोगी संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र (Maharashtra) आरोग्य विज्ञान विद्यापीठाने भारतीय औषध संशोधन संस्थेसमवेत सामंजस्य करार करून पुढाकार घेतला आहे, अशी माहिती कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी दिली. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने भारतीय औषध संशोधन संस्थे (IDRL) समवेत सामंजस्य करार केला आहे. जेनेटिक आणि मॉलीक्युलर बायोलॉजी विषयात व्यापक संशोधन व्हावे यासाठी कुलगुरू माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या मार्गदर्शनाखाली, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण व पुण्याचे भारतीय औषध संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास जोशी यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी आय. डी. आर. एल. चे विश्वस्त आर.जी. शेंडे, खजिनदार मंदार अक्कलकोटकर आदी उपस्थित होते. या कराराबद्दल कुलगुरू कानिटकर म्हणाल्या की, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पुणे येथील विभागीय केंद्र विस्तारीत करणे तसेच डिपार्टमेंट ऑफ जेनेटिक्स, इम्युनॉलॉजी, बायोकेमिस्ट्री अँड न्युट्रिशन विभागाच्या अंतर्गत जेनेटिक आणि मॉलीक्युलर बायोलॉजी विषयात अधिक संशोधन व्हावे याकरिता स्वर्गीय डॉ. के.सी. घारपुरे यांच्या नावाने ही प्रयोगशाळा संचलित करण्यात येणार आहे. भारतीय औषध संशोधन संस्थेच्या सहकार्याने शिक्षण, संशोधन, प्रभावी प्रात्यक्षिके आदींचा विस्तार करण्यात मदत होणार आहे. जेनेटिक व मॉलीक्युलर बायोलॉजी क्षेत्र यामध्ये संशोधन कार्याला मोठा वाव आहे. मात्र, त्यासाठी सुसज्ज लॅब व अनुषंगिक बाबी आवश्यक असतात. यासाठी विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे.

कशी असेल लॅब?

कुलगुरू कानिटकर म्हणाल्या की, करारातर्गंत पुण्याच्या शिवाजी नगर परिसरातील डॉ. घारपुरे यांच्या निवासस्थानाचा काही भाग कॅन्सर रोगावरील संशोधन व क्लिनीकल रिसर्चकरिता जेनेटिक अँड मॉलीक्युलर लॅबरॉटरी आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे उभारण्यात येणार आहे. उत्तम व अत्याधुनिक पध्दतीच्या क्लिनिकल आणि रिसर्चच्या सुविधा या लॅबच्या माध्यतातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या लॅबमध्ये मॉलीक्युलर बायोलॉजी, बायोकेमिक आणि कायटोजेनेटीक तपासणींची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोणत्या चाचण्या होणार?

कुलगुरू कानिटकर म्हणाल्या की, लॅबमध्ये कॅरिओटायपिंग, फिश, न्यू बॉर्न स्क्रिनींग, एच. पी. एल. सी. फोर थॅलेसिमिया, मॉलीक्युलर टेस्टींग फोर अंकोपॅनल, कारर्डिक रिस्क पॅनल, डायबेटीक रिस्क पॅनेल आदी चाचण्या घेण्यात येणार आहेत. या लॅबच्या माध्यमातून कॅन्सर रोगावर औषध व उपचार पध्दतीत संशोधनाला चालना देण्यात येणार आहे. या माध्यमातून विविध शैक्षणिक व संशोधन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने एक वर्षाचा जेनेटिक डायग्नोसिस फोर क्लिनीशिअन्स फेलोशिप अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर सहा महिन्याचे प्रमाणपत्र, अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात येणार आहे.

सर्टिफिकेट कोर्स होणार सुरू

कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले की, या सामंजस्य कराराच्या माध्यमातून सर्टिफिकेट कोर्स इन जेनेटिक डायग्नोसिस या अभ्यासक्रमात वीस विद्यार्थ्यांची क्षमता असून डाग्नोस्टिक टेक्नीक्स यामध्ये शिकविल्या जाणार आहेत. सॅम्पल कलेक्शन, रुटीन लॅबवर्क, सायंटिफिक रेकॉर्ड मेंटेनन्स आदी बाबी शिकविल्या जाणार आहेत. यातून अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केलेले विद्यार्थी आरोग्य विषयक सर्वेक्षण, संशोधन यामध्ये हेल्थडाटा गोळा करणे त्याचे पृथ्थकरण करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि ते मांडणे याबाबत कार्य करू शकतील.

काय आहे प्रवेशाची पात्रता?

कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले की, एक वर्षाचा जेनेटिक डायग्नोसिस फोर क्लिनीशिअन्स फेलोशिप अभ्यासक्रमासाठी दहा विद्यार्थी प्रवेशक्षमता आहे. यासाठी आरोग्य विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी अशी पात्रता आहे. हे विद्यार्थी मेडिकल हिस्ट्री, डेव्हलपमेंटल अँड रिप्रोडक्टीव हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री यांचे निरीक्षण व रेकॉर्ड मेंटेनन्स, रुग्णांसाठी कोणत्या जेनेटिक टेस्टची आवश्यकता आहे त्याचे निदान, जेनेटिक टेस्टचे रिपोर्ट समजून घेणे आणि त्याचे विश्लेषण करुन रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधणे, सायकोलॉजीकल सपोर्ट देणे, रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे याचबरोबर जेनेटिक डाग्नोटिक्सचे विविध तंत्र या विद्यार्थ्यांना शिकविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.