Manoj Jarange : येवल्यात आता काय होणार? मनोज जरांगे यांच्या समर्थकांच्या वाढल्या अडचणी, निवडणूक भरारी पथकाच्या भूमिकेने खळबळ

Manoj Jarange Yewla Constituency : मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा दौरा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. येवला-लासलगाव मतदारसंघात त्यांनी दोघांना पाडा असा संदेश दिला. त्यानंतर आता त्यांच्या समर्थकांवर निवडणूक भरारी पथकाने कारवाई केल्याने वातावरण तापलं आहे.

Manoj Jarange : येवल्यात आता काय होणार? मनोज जरांगे यांच्या समर्थकांच्या वाढल्या अडचणी, निवडणूक भरारी पथकाच्या भूमिकेने खळबळ
येवल्यात वातावरण तापणार
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 2:57 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षीपासून मराठा समाजाची मोटं बांधण्यात मोठं यश मिळवलं. जरांगे पाटील यांनी समाजासाठी उपोषणाचे अनेकदा शस्त्र उपसले. पण सगेसोयरे आणि सरसकट ओबीसी आरक्षणावरून त्यांचे सरकारशी चांगलेच वाजले. महायुती सरकारला त्यांनी लोकसभा निवडणुकीत तिसरे रत्न दाखवले. तर आता विधानसभेत सुद्धा त्यांनी पाडापाडीचा नारा दिला आहे. विधानसभेत उमेदवार देण्याचे त्यांनी जाहीर केले होते. पण वेळेवर त्यांनी माघार घेतली. पण निवडणुकीत कोणाला पाडायचे याचे निरोप दिल्याचे ते सांगायला विसरले नाहीत. तर निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांनी येवला-लासलगाव मतदारसंघाचा दौरा केल्याने राजकारण तापले.

जरांगेंचा नारा, दोघांना पाडा

येवला मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने माणिकराव शिंदे यांना मैदानात उतरवले आहे. येवल्यात मराठा विरुद्ध ओबीसी असे समीकरण दिसत आहे. भुजबळ आणि जरांगे पाटील यांचा वाद मध्यंतरी चांगलाच पेटला होता. त्यातच जरांगे पाटील यांनी काल येवला-लासलगाव मतदारसंघाचा दौरा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी येवल्यातून सांत्वना दौरा केला.

हे सुद्धा वाचा

या दौऱ्यात त्यांनी सभा घेतली. त्यात त्यांनी इथं दोघांना पाडा असा थेट संदेश दिला. अर्थात त्यांनी कुणाचंच नाव घेतलं नाही. पण त्यात त्यांनी दोघांन पाडा याचा अर्थ छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना पाडा असा घेण्यात येत आहे. समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत.

आता आयोजक-संयोजकांवर गुन्हा

मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या येवला आणि लासलगाव येथील आयोजक समर्थकांवर निवडणूक भरारी पथकाने गुन्हा दाखल केला आहे. येवला तालुका आणि लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवानगी रस्त्यावर सभा, गर्दी जमावण्यात आली तसेच रात्री उशिरा 10 वाजेनंतर सभा सुरु राहिल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात 5 ते 6 आयोजक आणि समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लासलगाव पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यात 14 आयोजक- समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अद्याप कुणालाच अटक करण्यात आलेली नाही. पोलीस तपासात या गुन्ह्यात आयोजक समर्थकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.