Mahashivratri 2021 : जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जिथे महादेवासमोर नंदी नाही!

नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. पुराणात असे म्हटले आहे की, भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यास होते. हे देशातील पहिले मंदिर आहे जेथे नंदी भगवान शंकरासमोर नाही.

Mahashivratri 2021 : जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जिथे महादेवासमोर नंदी नाही!
कपालेश्वर मंदिर, नाशिक
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 8:16 AM

नाशिक : जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा महादेवांच्या समोर असतोच. नंदी हा जरी महादेवांचे वाहन समजला जात असला, तरी नाशिकच्या एका मंदिरात मात्र महादेवांच्या पिंडीसमोर नंदीच नाही असं काय झालं की, महादेवांनी याठिकाणी नंदीला आपला गुरु मानलं…चला तर, जाणून घेऊया नाशिकच्या ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिराची महती…(Mahashivratri 2021 special story of kapaleshwar temple nashik Where there is no Nandi in front of Mahadev)

नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. पुराणात असे म्हटले आहे की, भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यास होते. हे देशातील पहिले मंदिर आहे जेथे नंदी भगवान शंकरासमोर नाही.

अशी आहे या मागची आख्यायिका…

जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील महादेव मंदिरात गेलात, तर शंकराच्या पिंडीजवळ तुम्हाला नंदी विराजमान दिसेलच. नंदी हा महादेवांच वाहन असल्याने महादेवांच्या प्रत्येक मंदिरात नंदीला महादेवांच्या पिंडीसमोरचं स्थान असतं. मात्र, नाशिकच्या ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिर याला अपवाद आहे. महादेवांचं हे एकमेव मंदिर आहे, ज्याठिकाणी नंदीच नाही. महादेवांना ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं, त्यावेळी महादेवांनी या पातकापासुन स्वताची मुक्ती करुन घेण्यासाठी त्रिभुवन पालथं घातलं. मात्र, त्यांचं पातक काही दूर होईना… आपण या पातकापासून कसं सुटणार याची चिंता महादेवांना सतावत असतानाच, नंदीनं त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं. याठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं पातक दूर झालं आणि ते ब्रम्हहत्येच्या दोषातुन मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली, यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलंय.

Kapaleshwar temple

कपालेश्वर मंदिर

बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य

एका कपालेश्वर महादेवाच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य असल्याचा पौराणिक संदर्भ सापडतो. नाशिकच्या या कपालेश्वर महादेव मंदिरात श्रावणातल्या सोमवारी तसंच, शनिवार आणि प्रदोषाच्या दिवशी महादेवांची पालखी काढली जाते. महादेवांच्या या कपालिक पिंडीचं दर्शन घेतल्यास सर्वपातकांचा नाश होतो, अशी धारणा आहे (Mahashivratri 2021 special story of kapaleshwar temple nashik Where there is no Nandi in front of Mahadev).

महादेवाचा उत्सव

श्रावणी सोमवार, महाशिवरात्री याव्यतिरिक्त इतर दिवशी देखील या महादेव मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात शिव उपासक दूध, दही, मध, फळांचे रस याने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. संकटनाशक, इच्छा पूर्ण करणारे, महा पापांचा नाश करणारे आणि आपल्या भक्तांना गंभीर संकटातूनसुद्धा लीलया बाहेर काढणारे कपालेश्वर महादेव म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत.

रामकुंडाचे दर्शन

नाशिकमधल्या प्रसिद्ध आणि पुरातन मंदिरांमध्ये या कपालेश्वर मंदिराची गणना होते. कपालेश्वर मंदिर गावाच्या मध्यवर्ती भागात आहे. पेशव्यांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली आले की गोदावरी नदी आहे. तसेच जवळच रामकुंडही आहे. या रामकुंडात प्रभू रामचंद्रांनी दशरथाचे श्राद्ध केले होते अशी श्रद्धा आहे. कपालेश्वर मंदिराच्या समोर आणि गोदावरी नदीच्या पलिकडे प्राचीन सुंदर नारायण मंदिरही आहे. हरिहर भेट महोत्सवाच्या वेळी कपालेश्वर आणि सुंदरनारायण मंदिरांमधून अनुक्रमे शंकर आणि विष्णू यांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात आणि त्यांची भेट घडवली जाते. श्रावणी सोमवारी आणि इतर सोमवारीही या कपालेश्वर मंदिरात कायम भाविकांची गर्दी असते.

(Mahashivratri 2021 special story of kapaleshwar temple nashik Where there is no Nandi in front of Mahadev)

हेही वाचा :

Mahashivaratri 2021 | महादेवाचे असे मंदिर जिथले शिवलिंग मूळ जागेवरून पुढे सरकते, वाचा या मंदिराचे अद्भुत किस्से…

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.