लासलगाव बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक; 27 दिवसांत 180 कोटींची उलाढाल

Onion Market | गेल्यावर्षी वरील कालावधीत बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर 6 लाख 26 हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन 50 कोटी 18 लाख 50 हजार इतक्या रकमेची उलाढाल झाली होती.

लासलगाव बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक; 27 दिवसांत 180 कोटींची उलाढाल
लासलगाव कांदा मार्केट
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 11:50 AM

नाशिक: आशिया खंडात कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 27 दिवसात कांद्याची 11 लाख 70 हजार क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत तब्बल 180 कोटी रुपयांची उलाढाल झाली. (Onion market in Lasalgaon Nashik Maharashtra)

नाशिक जिल्ह्यातील कोव्हीड-19 चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दि. 12 मे, 2021 ते 23 मे, 2021 अखेर नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करून सर्व बाजार समित्यांचे शेतीमाल लिलावाचे कामकाज बंद केले होते. त्यानंतर दि. 24 मे, 2021 पासुन जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे लिलावाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले दि. 24 मे, 2021 ते 21 जुन, 2021 ह्या कालावधीत लासलगांव बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर 11 लाख 70 हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली.

गेल्यावर्षी वरील कालावधीत बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर 6 लाख 26 हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन 50 कोटी 18 लाख 50 हजार इतक्या रकमेची उलाढाल झाली होती. त्यामुळे मागील वर्षाच्या वरील कालावधीतील कांदा आवकेच्या तुलनेत चालु वर्षी लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर 5 लाख 44 हजार क्विंटल कांद्याची जादा आवक होऊन 130 कोटी इतक्या रकमेची जादा उलाढाल झाली आहे. त्याचप्रमाणे ह्या कालावधीत मागील वर्षापेक्षा सध्याच्या सरासरी बाजारभावात देखील 700 रूपयांनी वाढ झाली आहे सद्यस्थितीत कांद्याचे सरासरी बाजारभाव स्थिर असुन शेतकरी बांधवांनी त्यांचा कांदा हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून बाजार आवारावर विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केले.

कांदा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विका

भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी चांगल्या प्रतवारीचा आणि कमी दरामध्ये पाकिस्तानचा कांदा उपलब्ध झाला आहे.  श्रीलंकेत भारतीय कांदा 450 डॉलरमध्ये प्रति टन तर पाकिस्तानचा कांदा 310 डॉलर प्रति टनामध्ये मिळत आहे. मात्र देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याने बाजारभाव टिकून राहण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विक्री करावा. पाकिस्तानच्या कांद्यामुळे भारतीय कांद्याच्या बाजारभावात सध्यातरी कोणताही परिणाम होणार नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची घाई करू नये असे या क्षेत्रातील तज्ञ सांगत आहेत.

हे ही वाचा :

मका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु

मका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु

भात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी, फिश राईस फार्मिंग नेमकं काय?

(Onion market in Lasalgaon Nashik Maharashtra)

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.