कांद्याला पाणी देण्यासाठी शेतात गेला तो परतलाच नाही; मनमाडमध्ये नेमकं काय घडलं?

रवींद्र दराडे हा तरुण शेतकरी. शेतात कांद्याचे पीक घेत होते. कांद्याला पाण्याची गरज होती. त्यामुळे ते कांद्याला पाणी देण्यासाठी शेतात गेले.

कांद्याला पाणी देण्यासाठी शेतात गेला तो परतलाच नाही; मनमाडमध्ये नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 10:02 AM

 मालेगाव : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात गेल्याशिवाय पर्याय नाही. काही शेतांमध्ये पाणी देण्यासाठी विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. या विहिरीमधील पाणी पिकांना द्यावं लागते. पण, कधीकधी या विहिरीसुद्धा धोकादायक ठरत आहेत. दोन दिवसांपूर्वी आजीसोबत शेतात पाणी आणण्यासाठी गेलेली १४ वर्षीय मुलगी विहिरीत पडली. बाजूला बांधलेल्या म्हशीने धक्का दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना आता मनमाड भागात दुसरी घटना समोर आली. या घटनेत शेतात कांद्याला पाणी देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. विहिरीतील पंप चालू करण्यासाठी गेलेल्या रवींद्र दराडे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे शेतात जाण्याचा हा त्यांचा शेवटचा दिवस ठरला.

MALEGAON 1 N

कांद्याला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते

मनमाडच्या गर्डरशॉप भागात शेतातील कांद्याला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. रवींद्र बाळू दराडे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मनमाड-भुसावळ लोहमार्ग रेल्वे लगतच्या पाचीपुल भागातील शेतामध्ये कांद्याला पाणी देण्यासाठी गेले होते. विहिरीवरील वीज पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांचा विहिरीत तोल गेल्याने मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

विहिरीत बुडून मृत्यू

रवींद्र दराडे हा तरुण शेतकरी. शेतात कांद्याचे पीक घेत होते. कांद्याला पाण्याची गरज होती. त्यामुळे ते कांद्याला पाणी देण्यासाठी शेतात गेले. शेतात विहीर आहे. या विहिरीत वीज पंप आहे. तो वीज पंप सुरू करण्यासाठी ते विहिरीजवळ गेले. पण, तोल गेल्याने ते खाली पडले. त्यामुळे विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. विहिरीत पडल्यानंतर गटांगळ्या खाऊ लागले. पण, वेळेवर त्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

शेतातून पिक घेण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करतात. रात्री-अपरात्री शेतात जातात. मात्र, त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. कांद्याचे सध्या वांदे झाले आहेत. अतिशय कमी दरात कांदा विकावा लागत आहे. त्यात पिक घेण्यासाठी धोका पत्करून शेतकऱ्याला काम करावं लागतं. त्यात त्यांचा जीवही जातो.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.