मालेगाव दंगलप्रकरणी संशयितांना मोठा धक्का; 18 जणांचा जामीन फेटाळला

गेल्यावर्षी मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, असे पुढे आले आहे. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे तपासात समोर आले आहे.

मालेगाव दंगलप्रकरणी संशयितांना मोठा धक्का; 18 जणांचा जामीन फेटाळला
Court
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 12:14 PM

नाशिकः गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नाशिक (Nashik) जिल्ह्यासह अख्खा महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या मालेगाव दंगल (Malegaon riots) प्रकरणी न्यायालयाने (Court) 18 संशयितांचा जामीन फेटाळला आहे. मालेगावमध्ये 12 नोव्हेंबर 2021 रोजी हिंसक घटना घडली. त्यात अनेक दुकानांची जाळपोळ, मोडतोड करण्यात आली. यात अनेक जण जखमीही झाले. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांतील 9, तर आयेशानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील 9 जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, या संशयितांची चौकशी पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी पोलिसांनी केली. न्यायाधीशांना हा युक्तीवाद ग्राह्य धरत हा जामीन फेटाळला आहे.

नेमके प्रकरण काय?

गेल्यावर्षी मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, असे पुढे आले आहे. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. यावरून दंगल उसळली. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचलसह इतर संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. आता याप्रकरणातील संशयितांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात ध्याव घ्यावी लागेल.

निवडणुका तोंडावर

मालेगाव दंगलीप्रकरणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी रजा अकॅडमीवर आरोप केले होते. दंगलीप्रकरणी अटक केलेला एक नगरसेवक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. एक संशयित नगरसेवक जनता दलाचा आहे. मुंबईतून रजा अकादमीच्या काही लोकांना पैसे वाटले. दंगलीच्या एकदिवस अगोदरच्या रात्री दंगेखोरांनी दगड आणून ठेवले होते. वीस वर्षांपासून मालेगाव शांत आहे. मात्र, काही जण ते मुद्दाम पेटवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, येणाऱ्या काळात मालेगाव महापालिकेची निवडणूक आहे. त्या तोंडावर हा जामीन फेटाळण्यात आला आहे. यातील अनेक संशयित हे विविध राजकीय पक्षांशी निगडित आहेत. त्यामुळे त्यांना जोरदार धक्का बसला आहे.

इतर बातम्याः

Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास…!

महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!

नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.