Malegaon Wedding : मालेगावातील “गोष्ट एका दुसऱ्या लग्नाची”, आई-वडिलांच्या लग्नात मुलांची धमाल
घडलेला प्रकार थोडा वेगळा वाटत असला तरी तो सत्य असून पती-पत्नींनेच एकमेकांसोबत पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकतांचा आनंद साजरा केला. आम्ही तुम्हाल ही कुठली बाहेरची काहणी सांगत नाही तर घडलंय आपल्या नाशिकमधील मालेगावात. ते म्हणतात ना हौसेला मोल नसते, असाच काहीसा प्रकार याठिकाणी घडला आहे.
मालेगाव : लग्न म्हटले (Malegaon Wedding) म्हणजे दोन जिवाचे मिलन. एकदा वधू-वराने अग्निभोवती सातफेरे घेतले म्हणजे ते जन्मोजन्मी एकमेकांसोबत आयुष्य जगण्याच्या आणाभाका घेतात. अशाच एका दाम्पत्याच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झालीत म्हणून त्यांच्या मुलांनीच आई-पप्पांच्या लग्नात (Mother Father Marriage) आपण नव्हतो, आणि त्यांच्या लग्नाचा आनंद आपल्याला लुटता यावा, तसेच त्यावेळी राहून गेलेली हौसमौज आता त्यांना पण पुन्हा अनुभवता यावी, यासाठी पोटच्या मुलानींच आपल्या आई-वडिलांचे मोठ्या धुमधडाक्यात दुसऱ्यांदा लग्न (Second Marriage) लावून दिले. घडलेला प्रकार थोडा वेगळा वाटत असला तरी तो सत्य असून पती-पत्नींनेच एकमेकांसोबत पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकतांचा आनंद साजरा केला. आम्ही तुम्हाल ही कुठली बाहेरची काहणी सांगत नाही तर घडलंय आपल्या नाशिकमधील मालेगावात. ते म्हणतात ना हौसेला मोल नसते, असाच काहीसा प्रकार याठिकाणी घडला आहे. या लग्नाची सध्या सर्वत्र जोदार हवा आहे.
कोण आहेत वधू वर?
मालेगाव शहरातील धनंजय निकम आणि पत्नी भावना यांच्या लग्नाची ही गोष्ट. त्यांच्या मुलांनी आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्यासाठी विशेष गिफ्ट म्हणून हळदीपासून ते मंगलाष्टकापर्यंत लग्नाचा दुसऱ्यांदा योग जुळवून आणला. मम्मी पप्पाचे लग्न अनुभवण्याची इच्छा लेकरांनी सत्यात उतरवली. पन्नाशीच्या उंबरठ्यावरच्या नवरदेव नवरीचा लग्न सोहळा वऱ्हाडी मंडळींसह उपस्थितांमध्ये सुखाचे चांदणे पेरणारा ठरला. या अजब लग्नाची शहात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गुरुवारी हा विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे या कुटुंबाचा आनंद सध्या द्विगुणित झाला आहे. याच्यापेक्षा मोठा क्षण या जोडप्या आयुष्यात कदाचितच आला असेल.
कसा रंगला लग्नसोहळा?
मुलगी गौतमी आणि मुलगा विनीत आणि त्यांची काकू शुभांगी निकम यांनी मिळून हा विवाह सोहळा आयोजित केला. शहरातील एका सभागृहात मोठ्याथाटामाटात हा विवाह पार पडला. अगदी मांडवापासून ते हळद, गाणी, नाचणे, मंगलाष्टके अशा सर्व विधी या विवाहात पार पडल्या. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्याला आतप्तेष्ठांनी देखील हजेरी लावली. लेकरांसह वऱ्हाडी देखील मनसोक्त नाचले. गोरज मुहूर्तावर लग्न झाले. पुरोहितांनी मंगलाष्टकांतून वधू- वरांना पुन्हा एकदा ‘शुभमंगल सावधान’चा मंत्रोच्चार केला. अक्षतांद्वारे वधु वर पुन्हा एकदा आशीर्वादाचे धनी झाले. एकमेकांना हार घालत जन्मोजन्माच्या पुन्हा एकदा आणाभाका घेतल्या. त्यामुळे सध्या सोशल मीडियावरही याच लग्नाची हवा आहे.