राज ठाकरे अन् अमित शाह यांच्या भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, ते भेटले खरे पण…

Rohit Pawar on Raj Thackeray Amit Shah Meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाह यांची काल भेट झाली. या भेटीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, ते भेटले खरे पण... महाविकास आघाडीच्या जागावाटपावर काय म्हणाले? पाहा...

राज ठाकरे अन् अमित शाह यांच्या भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, ते भेटले खरे पण...
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 11:38 AM

मनोहर शेवाळे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मालेगाव | 20 मार्च 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट झाली. यात मनसे आणि भाजप युतीची चर्चा झाल्याचं बोललं जातंय. यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे अमिल शाह यांना भेटले. पण त्यांनी निर्णय घेतला नाही. स्वाभिमानी मराठी माणूस दिल्लीला जाऊन वाटाघाटी करीत नाहीत. 2019 ला राज ठाकरे हे भाजपा विरोधात बोलत होते. आता जर त्यांनी काही निर्णय घेतला तर 2019 चे भाषण आणि आत्ताचे भाषण लोक तुलना करतील. त्यात तफावत दिसली तर राजकीय तफावत दिसेल. मला असे वाटते की राज ठाकरे तसा निर्णय घेणार नाहीत, असं रोहित पवार म्हणाले.

जागावाटप कधी?

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात जागा वाटपाचा मुद्दा वारंवार चर्चेत येत आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होणार? यावर रोहित पवांरांनी आपलं मत मांडलं. दोन दिवसात जागा वाटपाचा तिढा संपेल. कदाचित आज- उद्या काही नावे घोषित होतील, असं रोहित पवारांनी म्हटलं.

वंचित मविआत येणार?

वंचित महाविकास आघाडीत येणार का? यावर रोहित पवारांनी स्पष्ट भाष्य केलं. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. योग्य तो निर्णय घेतला जाईल. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येतली अशी अपेक्षा आहे. दुर्दैवाने वंचित ज्या ठिकाणी लढले त्या ठिकाणी मताधिक्य आणि विभाजन पाहिलं तर त्याचा फायदा भाजपला झाला आहे. यंदा ते घडणार नाही. आंबेडकरसाहेब योग्य तो निर्णय घेतील, असं रोहित पवार म्हणाले.

घड्याळ चिन्हाबाबत म्हणाले…

राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हावर सुप्रीम कोर्टने निकाल दिला. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने दिलेला नर्णय स्वागतार्ह आहे. घड्याळ चिन्ह वापरायला अटी शर्ती दिल्या आहेत. भाजप अजित दादाच्या पक्षाला वेगळ्या पद्धतीने वागवत आहे. अटी ताटित अडकावत आहे. नंतर ते चिन्ह राहील असे वाटत नाही. हे काहींना कळले असून ते किती दिवस त्या पक्षात राहतील ते येणाऱ्या काळात दिसेल, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार सध्या उत्तर महाराष्ट्र दौरा करत आहेत. सामान्यांशी ते संवाद साधत आहेत. शेतकरी ट्रॅक्टरसाठी अनुदान अजून शेतकरयांना मिळाले नाही. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. अख्खा महाराष्ट्र अडचणीत आहे. भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवायचे आहे, असं रोहित पवार यांनी या दौऱ्या दरम्यान म्हटलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.