पुण्याकडून राजस्थानकडे जाणाऱ्या टँकरची ट्रकला धडक, दोघांचा होरपळून मृत्यू
कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक आणि सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. (Manmad Malegaon Road Accident)

नाशिक : मनमाड – मालेगाव रोड भीषण अपघात झाला आहे. कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक आणि सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. (Manmad Malegaon Road Accident Two People Died)
दोन्ही वाहने जळून खाक
सोमवारी रात्री मनमाड-मालेगाव मार्गावर कौलाने गावाजवळ भीषण अपघात झाला. यात भरधाव वेगाने सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रेलर आणि कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. यानंतर दोन्ही वाहनाने पेट घेतला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन्ही वाहने जळून खाक झाली.
वाहतुकीचा 3 तास खोळंबा
या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच मालेगाव अग्निशमन दल आणि तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या वाहनांना लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. या अपघातामुळे मनमाड-मालेगाव मार्गावर वाहतुकीचा सुमारे 3 तास खोळंबा झाला.
दोन्ही वाहने हटवून वाहतूक सुरळीत
ही आग आटोक्यात आणल्यानंतर दोन्ही वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. हा टँकर पुणे येथून राजस्थानकडे जात होता. तर आयशर ट्रक हा मनमाडकडे येत असतेवेळी हा अपघात झाला. (Manmad Malegaon Road Accident Two People Died)
VIDEO | मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, टँकरमधून केमिकल गळती, वाहने घसरल्याने वाहतूक विस्कळीतhttps://t.co/z6okIliicQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2021
संबंधित बातम्या :