निसर्गाने पाठ फिरवली, मायबाप सरकार आता तुम्ही तरी..; बळीराजाची सरकारला आर्त हाक

कधी गडगडणारा बाजारभाव तर कधी  अवकाळी पावसाचे थैमान यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सातत्याने कोसळणाऱ्या बाजारभावामुळे शेतात आलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.

निसर्गाने पाठ फिरवली, मायबाप सरकार आता तुम्ही तरी..; बळीराजाची सरकारला आर्त हाक
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 6:41 PM

मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून कांदा दरातील घसरण, सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि शिवाय गेल्या अनेक वर्षात शेती मालाला मिळत नसलेला भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. लहान मुलांना जोपासतो त्या तुलनेत जपून वाढविलेल्या पिकाला बाजारेठांमध्ये विरक्रिसाठी गेल्यावर लागणार खर्च देखील निघत नसल्याने सरकारने त्याकडे लक्ष घालण्याची मागणी मालेगावातील शेतकरी करीत आहेत.

आधीच अर्थ चक्रात सापडलेला कांदा उत्पादक शेतकरी दुर्दैवाने हातबल झालेला असतानाच अस्मानी संकटानेदेखील डोळे वटारले आहेत.

कष्टाने पिकवलेल्या कांद्याला सध्या कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने आधीच आर्थिक संकटात सापडल्या शेतकऱ्याला आता अवकाळी पावसानेगी फटका दिला आहे.

कांदा लागवडी पासून ते निघेपर्यंतचा लागणारा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आता मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

जवळपास गेल्या तीन ते चार वर्षापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी त्रस्त झाला असून उत्पादन खर्च देखील निघत नसलेल्या शेतीच्याच अर्थचक्रात अडकून पडला आहे. आता आहे त्या भावात कांदा विकावा लागणार असून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी सरकारने तरी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

मागील गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वेगवेगळ्या अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये तरी शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी आता शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.

कधी गडगडणारा बाजारभाव तर कधी  अवकाळी पावसाचे थैमान यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सातत्याने कोसळणाऱ्या बाजारभावामुळे शेतात आलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.