“शिक्षणाच्या प्रश्नावर ज्यांची भूमिका स्पष्ट, आम्ही त्यांच्या सोबत”;पदवीधर निवडणुकीत कपिल पाटील यांचा तांबे यांना बिनशर्त पाठिंबा
राजकीय वर्तुळातही सुधीर तांबे तुमच्यावर अन्याय झाला आहे. मात्र यावेळी आखिर सत्य की जित होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नाशिकः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुधीर आणि सत्यजित तांबे या पितापुत्रांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली होती. त्यातच सत्यजित तांबे यांची भाजपबरोबर जवळीक वाढल्याने आणि त्यांनी भाजपचा पाठिंबा मागितल्याने तांबे यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर तांबे यांच्या उमेदवारीवरून उलटसुलट चर्चा चालू असतानाच आज लोकभारतीचे नेते आमदार कपिल पाटील यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवत त्यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीविषयी बोलताना आमदार कपिल पाटील यांनी सांगितले की, इथे येई पर्यंत अनेक ज्येष्ठ नेत्यांचे मला फोन येऊन गेले.
ज्या आघाडीला आम्ही समर्थ दिली होती, त्यांच्याकडून आमची माफक अपेक्षा होती की त्यांनी सगळ्यांना सोबत घ्यावं. मात्र तसं काही झालं नाही.
सत्यजित आणि तांबे यांनी कोणाची फसवणूक केली नाही. त्यामुळे अजूनही जागे व्हा. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट असून शिक्षणाच्या प्रश्नावर ज्यांची भूमिका स्पष्ट आहे त्यांनाच आम्ही साथ देणार असल्याचे स्पष्टपणे कपिल पाटील यांनी सांगितले.
सुधीर तांबे आमदार म्हणून ते काँग्रेसकडून निवडून आले असले तरी पण त्यांच्या घरात लाल बावट्याचा वारसा आहे. त्यामुळेच डॉ तांबे पीडितांच्या बाबत कोणतेही तडजोड करत नाही असे गौरवोद्गगारही यावेळी काढण्यात आले.
आमदार कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्याविषयी बोलताना सांगितले की, सत्यजित तांबे यांना पुढे आणा हे गेल्या 3 वर्षांपासून मी डॉक्टरांना सांगतो आहे.
त्यांचा अभ्यास दांडगा आहे, ते लेखक, अनुवादक आणि चांगले अभ्यासक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सत्यजित तांबे यांच्या या गुणामुळेच अशा तरुणाला संधी दिली पाहिजे असं स्पष्टपणे त्यांनी सांगितले.
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी विषयी बोलताना कपिल पाटील म्हणाले की, योग्य वेळेला तरुणांना संधी दिली नाही तर आपलं राजकारण खाक होतं.
तसेच राजकीय वर्तुळातही सुधीर तांबे तुमच्यावर अन्याय झाला आहे. मात्र यावेळी आखिर सत्य की जित होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
त्यामुळे शिक्षक भारतीच्यावतीने सत्यजित तांबे हे आपले उमेदवार असून आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
यावेळी सत्यजित तांबे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, शिक्षक भारतीने अशा वेळेस पाठिंबा दिला, ज्या वेळेस आमच्या संपूर्ण कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं आहे.
मात्र मी आपल्या अपेक्षा पूर्ण करणार असून गेल्या 22 वर्षापासून संघटनेत काम करतो आहे असंही सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले.