दहीहंडी साजरी करणारच, आम्ही अस्वल, आमच्यावर खूप केस; संदीप देशपांडे आक्रमक

जन आशीर्वाद यात्रा आणि आंदोलनावेळी कोरोना नसतो का? असा सवाल करतानाच आम्ही दहीहंडी साजरी करणारच, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं. (mns leader sandeep deshpande insist on celebrating Dahi Handi in Mumbai)

दहीहंडी साजरी करणारच, आम्ही अस्वल, आमच्यावर खूप केस; संदीप देशपांडे आक्रमक
sandeep deshpande
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 11:50 AM

नाशिक: जन आशीर्वाद यात्रा आणि आंदोलनावेळी कोरोना नसतो का? असा सवाल करतानाच आम्ही दहीहंडी साजरी करणारच, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं. आम्ही अस्वल आहोत, आमच्यावर खूप केस आहे, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला. (mns leader sandeep deshpande insist on celebrating Dahi Handi in Mumbai)

संदीप देशपांडे यांनी मीडियाशी बोलताना हे स्पष्ट केलं. आम्ही दहीहंडी साजरी करणारच आहोत. आंदोलनावेळी आणि जन आशीर्वाद यात्रेवेळी कोरोना नसतो का? हिंदू आणि मराठी सणांनाच बंदी का? कोरोनाची तिसरी लाट येणार याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुम्हाला वाटलं की तिसरी लाट येणार आहे का?, असा सवाल देशपांडे यांनी केला. आमच्यावर कितीही केसेस टाका. आम्ही अस्वल आहोत. आमच्यावर खूप केस आहेत, असंही ते म्हणाले.

धनुर्विद्या केंद्रावरून टीका

मुंबईच्या दादरमधील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र बंद आहे. तिथला बाण महापौर बंगल्यात गेल्यामुळे केंद्र बंद केलं आहे. तुमची निशाणी बाण आहे त्याच तरी भान ठेवा, नाही तर तुधमची निशाणी घड्याळ किंवा हात करा, असा टोला लगावतानाच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

शाखाध्यक्ष पक्षाचा कणा

यावेळी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीही मीडियाशी संवाद साधला. एकाच ठिकाणी सगळ्यांना भेटणं अवघड होतं. अनेकांना शाखाध्यक्ष होण्याची इच्छा आहे. त्यामुळे तीन ठिकाणी बैठक घेतली आहे. शाखा अध्यक्ष हा पक्षाचा कणा आहे. राज ठाकरे सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून शाखा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे प्रभाग अध्यक्ष हे पद ठेवण्यात आलेलं नाही. शाखाधक्ष महत्वाचा आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.

कोणतंही सरकार कायम नसतं

तुम्ही आम्हाला सांगितलं महिन्यातून येत जा म्हणून आम्ही तयारीला लागलोय. आम्ही आमचे काम करत राहणार. कोणतंही सरकार कायम नसतं. लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सुज्ञ असतात, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

सत्तेत आल्यावर सगळं करू

मुंबई, पुणे, नाशिक सगळीकडे बैठक होत आहे. लोकांना कळलं की मनसेने किती काम केले आणि आमचे काम किती मेंटेन केले. नाशिकमध्ये पाण्याचा प्रश्न मनसेने सोडवला. मुंबईमध्ये खेळ खेळायला गार्डन देखील कमी आहेत. सत्तेत आल्यावर सगळं करू, असं त्यांनी सांगितलं. (mns leader sandeep deshpande insist on celebrating Dahi Handi in Mumbai)

संबंधित बातम्या:

भाजपशी कधीच कटुता येणार नाही, आम्ही हिंदुत्वाच्या बंधनात; संजय राऊतांचं मोठं विधान

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना ईडीचा धक्का, लोणावळा, जळगावातील संपत्ती जप्त

भाजपमधील घुसखोरांनी माहौल बिघडवला, भाजपला शुद्धीकरणाची गरज; संजय राऊतांचा टोला

(mns leader sandeep deshpande insist on celebrating Dahi Handi in Mumbai)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.