नाशिक महापालिकेसाठी मनसेची जोरदार तयारी, अमित ठाकरेंचा वन-टू-वन संवाद, मनसैनिकांमध्ये उत्साह

मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकीकडे पुण्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना, दुसरीकडे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी देखील नाशिकची कमान हाती घेतली आहे.

नाशिक महापालिकेसाठी मनसेची जोरदार तयारी, अमित ठाकरेंचा वन-टू-वन संवाद, मनसैनिकांमध्ये उत्साह
अमित ठाकरे आणि राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 8:09 PM

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंबर कसलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकीकडे पुण्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना, दुसरीकडे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी देखील नाशिकची कमान हाती घेतली आहे. अमित ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून, या दौऱ्या दरम्यान मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी ते वन-टू-वन संवाद साधत आहेत. एकूणच ठाकरे पितापुत्रांच्या या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या दौऱ्यांचा झंझावात सुरू केला आहे. तर, दुसरीकडे त्यांचे पुत्र आमित ठाकरे हे देखील वडिलांच्या सोबत मैदानात उतरले आहेत. गेल्या आठवड्यात केलेल्या दौऱ्यानंतर आमित ठाकरे पुन्हा एकदा दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान आमित ठाकरे मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधत आहेत. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसैनिकांची मोर्चेबांधणी करून महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी अमित ठाकरे यांनी कंबर कसली आहे, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं.

पक्षाची मजबूत बांधणी करण्याचं आव्हान

या दौऱ्यात अमित ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या सोबतच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना दिशा देऊन पक्षाची मजबूत बांधणी करण्याचे आदेश देखील अमित ठाकरे कार्यकर्त्यांना देत आहेत. नाशिक महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवायची असल्यास मनसेसमोर मजबूत पक्षबांधणींचं आव्हान आहे.

तरुणांचा मोठा प्रतिसाद

अमित ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातली तिसरी पिढी सक्रिय राजकारणात उतरून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आहे. अमित ठाकरेंना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तरुणांचा मोठा जथा मनसे कार्यालयाबाहेर दिसून येतो आहे. राज ठाकरे पुण्यात तर अमित ठाकरे नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत असल्याने आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे तयारीला लागण्याचे बघायला मिळत आहे.

इतर बातम्या:

राज ठाकरे पुण्यात, अमित ठाकरे नाशिकमध्ये, महापालिका निवडणुकीसाठी बापलेकाने दंड थोपटले!

अमित ठाकरे नाशिकमध्ये दाखल; पदाधिकाऱ्यांशी वन-टू-वन चर्चा करणार

MNS started preparation of Nashik Municipal Corporation Election Amit Thackeray on two days visit of MNS

पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.