मनसेचे नाशिकमध्ये ‘मिशन कमबॅक’; राज ठाकरेंच्या दौऱ्यात पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले
शिरोडकरांचा शिवसेनाप्रवेश मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र राज ठाकरे यांनी आता थेट अमित ठाकरे यांना मैदानात उतरवत 'मिशन कमबॅक'ला सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे.
नाशिक : मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमधून मनसेनं ‘मिशन कमबॅक’ सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांत बसलेले जोरदार धक्के सहन करत मनसेने पुन्हा नवनिर्माणाला सुरुवात केली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने मनसेने आगामी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. (MNS’s ‘Mission Comeback’ in Nashik; During Raj Thackeray’s visit)
कधी काळी मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या नाशिकमध्ये मधल्या काळात पक्षाची वाताहात झाली. मनसेची सत्ता तर गेलीच, पण नेत्यांची मोठी फळी पक्ष सोडून गेली. परिणामी, राज ठाकरे यांनीदेखील नाशिककडे दुर्लक्ष केले. विकासकामे करूनदेखील लोक निवडून देत नसतील तर काय उपयोग ? अशी नाराजी राज ठाकरे यांनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली. नाशिकप्रमाणेच राज्यातदेखील पक्षाची घडी कोलमडली. हे कमी म्हणून की काय, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनीदेखील हाती शिवबंधन बांधले आहे. शिरोडकरांचा शिवसेनाप्रवेश मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र राज ठाकरे यांनी आता थेट अमित ठाकरे यांना मैदानात उतरवत ‘मिशन कमबॅक’ला सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे.
धडाकेबाज स्वागत, फुलांची उधळण
राज ठाकरे यांचे नाशिकमध्ये धडाकेबाज स्वागत करण्यात आले. याचवेळी अमित ठाकरेंवर फुलांची उधळण करण्यात आली. तसेच जोरदार घोषणाबाजी करत मनविसेच्या कार्यकर्त्यांनी अमित ठाकरेंचे जल्लोषी स्वागत केले. राज ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनी मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भेटी घेतल्या. ‘झाले गेले सोडून द्या आणि कामाला लागा’, अस सांगत त्यांना पुन्हा एकदा ताकद देण्यात आली. याचदरम्यान मनसे हा राज ठाकरे यांच्या नावावर आणि जीवावर चालणारा पक्ष असून, कोणाच्या जाण्याने फरक पडत नाही असा टोला आदित्य शिरोडकर यांना लगावण्यात आला.
राजसाहेब देणार ती जबाबदारी स्वीकारणार – अमित ठाकरे
आपण राजसाहेब देतील, ती जवाबदारी स्वीकारायला तयार आहोत, असे अमित ठाकरे यांनी नमूद केले. त्यांनी या विधानातून मनविसेचे नवीन अध्यक्ष कोण होणार हे अप्रत्यक्षपणे सूचित केले, असे जाणकारांचे मत आहे. मनसे आणि नाशिक यांचे वेगळे नाते आहे. राज ठाकरे शिवसेनेत असतानादेखील बाळासाहेबांनी त्यांच्याकडे नाशिकची जबाबदारी दिली होती. राज यांनी ती सक्षमपणे पेलली. पुढे मनसेची स्थापना झाल्यानंतर राज यांना नाशिकने मोठे समर्थन दिले. नाशिकने मनसेला तब्बल 3 आमदार आणि 40 नगरसेवक दिले. त्यामुळेच मनसेने आता नाशिकमधून कमबॅक करण्याचे प्लॅनिंग केले असावे, असे राजकीय तज्ञांचे मत आहे
पक्षात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता
राज ठाकरे यांच्या दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यात पक्षात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे मनविसेचे संपूर्ण कारभार अमित ठाकरे ताब्यात घेतील, अशीदेखील चर्चा आहे. मनविसे आणि मनसे यांच्यात होणारे विसंवाद टाळण्यासाठी अमित ठाकरे स्वतः मैदानात उतरले असून यानिमित्ताने पक्षात पुन्हा एकदा चैतन्य पाहायला मिळत आहे. (MNS’s ‘Mission Comeback’ in Nashik; During Raj Thackeray’s visit)
‘…तर मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही’, पनवेलच्या उपमहापौरांचा इशाराhttps://t.co/g8eD3ECBfE#JagdishGaikwad #DBPatil #Thane #Dombivli
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 17, 2021
इतर बातम्या
अकोल्यातील सुन्न करणारी घटना, ज्या हातांना राखी बांधली त्याच हातांनी लहान बहिणीचा खून
बीड जिल्ह्यातील 3 तालुक्यात कडक निर्बंध, तालुके कोणते, निर्बंध काय? वाचा सविस्तर