MSEDCL : महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी चंद्रकांत डांगे; महसुलात 50 टक्के वाढ करण्याचा निर्धार

महावितरणच्या (MSEDCL) कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी चंद्रकांत डांगे (भाप्रसे) नुकतेच रुजू झाले आहेत. ते 2010च्या केडरचे भारतीय प्रशासन सेवेतील (IAS) अधिकारी आहेत.

MSEDCL : महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी चंद्रकांत डांगे; महसुलात 50 टक्के वाढ करण्याचा निर्धार
चंद्रकांत डांगे, सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 3:03 PM

नाशिकः महावितरणच्या (MSEDCL) कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी चंद्रकांत डांगे (भाप्रसे) नुकतेच रुजू झाले आहेत. ते 2010च्या केडरचे भारतीय प्रशासन सेवेतील (IAS) अधिकारी आहेत. महावितरणच्या एकूण महसुलात कोकण प्रादेशिक विभागाचे सध्या असलेले 43 ते 45 टक्के योगदान येत्या वर्षभरात 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. डांगे यांनी प्रतिष्ठित आयआयटी (IIT) खरगपूर येथून औद्योगिक अभियांत्रिकी या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून 1994 मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. नागपूरचे अप्पर जिल्हाधिकारी, जळगाव महानगरपालिका आयुक्त, मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात सहसचिव, ठाण्याच्या आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक आदी पदावर त्यांनी आपल्या लोकाभिमुख कामाचा ठसा उमटवला असून प्रशासकीय सेवेतील 28 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे महावितरणही कात टाकेल, अशी आशा व्यक्त होतेय.

कोरोना काळात उल्लेखनीय काम

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मीरा-भाईंदर महानगरपालिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यात स्थलांतरित मजुरांच्या निवास-भोजनापासून रुग्णांच्या उपचारासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांचा समावेश आहे. सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डांगे यांनी कोकण प्रादेशिक विभागातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्याबाबत आश्वासित करताना महसूल वाढीला प्राधान्य देण्याचा संकल्प केला आहे.

थकबाकी वसुलीवर देणार भर

सहव्यवस्थापक चंद्रकांत डांगे म्हणाले की, प्रादेशिक विभागातील भांडूप, कल्याण, रत्नागिरी, नाशिक, जळगाव या परिमंडलांमध्ये वीजचोरीला प्रभावी प्रतिबंध, वीज ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीवर भर राहणार आहे. शिवाय येणाऱ्या काळात महावितरणच्या एकूण महसुलात कोकण प्रादेशिक विभागाचा वाटा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. डांगे यांच्या नियुक्तीने महावितरणमध्येही अच्छे दिवस येतील, असा आशावाद व्यक्त होत आहे.

महावितरणच्या एकूण महसुलात कोकण प्रादेशिक विभागाचे सध्या असलेले 43 ते 45 टक्क्यांचे योगदान येत्या वर्षभरात 50 टक्क्यांपर्यंत वाढवू. थकबाकी वसुलीवर विशेष भर देण्यात येईल. वीजचोरीला आळा घालण्यावरही विशेष भर राहणार आहे.

– चंद्रकांत डांगे, सहव्यवस्थापकीय संचालक, कोकण प्रादेशिक विभाग, महावितरण इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.