Municipal Election 2022 : ऐन वेळेवर नियम बदलल्याने निवडणूक उमेदवारांच्या पैशांचा चुराडा, मतदार याद्यांचा खर्च गेला वाया

तिवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर मतदारांना त्यावर हरकती नोंदवता येतात. त्यासाठी ऑनलार्डन आणि ऑफलाईन पद्धतीने याद्या उपलब्ध करून दिल्या जातात. यातील ऑफलाईन याद्या शुल्क भरून खरेदी कराव्या लागतात.

Municipal Election 2022 : ऐन वेळेवर नियम बदलल्याने निवडणूक उमेदवारांच्या पैशांचा चुराडा, मतदार याद्यांचा खर्च गेला वाया
मतदार यादी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 4:04 PM

नाशिक, महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election 2022) मतदार याद्या, प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत काढण्यात आलेली असताना, राज्य सरकारने सदस्यसंख्या कमी करून चार सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. त्याचप्रमाणे शुल्क भरून प्रारूप आणि अंतिम याद्या खरेदी केलेल्या उमेदवारांचा खर्चदेखील वाया जाणार आहे. दरम्यान, निवडणूक विभागातून 191 प्रारूप मतदार याद्या व 60 अंतिम अशा ‘एकूण 251 याद्यांची विक्री झाली. प्रति यादीसाठी सरासरी 2 हजार रुपये प्रमाणे इच्छुकांच्या 5 लाख रुपयांचा चुराडा होणार आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सदस्य संख्येत वाढ करत प्रभाग रचना तीन सदस्यीय केली होती.

त्यानुसार प्रभाग रचना, मतदार याद्या, आरक्षण सोडत अशी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे इच्छुकांकडूनदेखील जोरदार तयारी केली जात होती. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या राज्य सरकारने अचानक प्रभाग रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीची तयारी करणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी गत चार महिन्यांपासून प्रारूप मतदार यादी आणि अंतिम यादीची प्रक्रिया सुरू आहे. प्रभागनिहाय तयार करण्यात आलेल्या या यादीतील मतदारांची नावे तपासणीसाठी अनेक इच्छुकांनी शुल्क भरून या याद्या खरेदी केल्या. यातील 191 जणांनी प्रारूप मतदार याद्यांची खरेदी केली. त्यासाठी प्रतिपेज दीड रुपया शुल्क भरावे लागले.

त्यानुसार प्रति यादी सरासरी 2 हजार रुपयांचा खर्च आला; तर अंतिम मतदार याद्यांच्या 60 प्रतींची विक्री झाली. यासाठीदेखील दीड रुपया प्रतिपेज शुल्क मोजावे लागले. त्यामुळे दोन्ही याद्या खरेदीसाठी इच्छुकांनी जवळपास 5 लाख रुपये खर्च केले असले तरी, आता संपूर्ण प्रक्रियाच बदलणार असल्याने हा सर्व खर्च व्यर्थ ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

महापालिकेने केली 244 याद्यांची छपार्ई

तिवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर मतदारांना त्यावर हरकती नोंदवता येतात. त्यासाठी ऑनलार्डन आणि ऑफलाईन पद्धतीने याद्या उपलब्ध करून दिल्या जातात. यातील ऑफलाईन याद्या शुल्क भरून खरेदी कराव्या लागतात. त्यातुसार प्रारूप मतदार यांच्या जाहीर झाल्यानंतर महापालिकेने 244 याद्यांची छपार्ड केली होती. त्यातील 119 याद्यांची विक्री झाली होती, तर अंतिम यादीच्या 60 प्रतींची विक्री झाली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.