अंजली दमानिया यांच्या आरोपांना छगन भुजबळांच्या पुतण्याचं प्रत्युत्तर; म्हणाले, हा तर बदनामीचा प्रयत्न

Sameer Bhujbal on Anjiali Damania Allegation about Chhagan Bhujbal : अंजली दमानिया यांच्याकडून गंभीर आरोप झाल्यानंतर समीर भुजबळ यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यांनी या जागेविषयी आपली भूमिका मांडली आहे. तसंच दमानिया यांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहे.

अंजली दमानिया यांच्या आरोपांना छगन भुजबळांच्या पुतण्याचं प्रत्युत्तर; म्हणाले, हा तर बदनामीचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 2:04 PM

उमेश पारीक, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, लासलगाव, नाशिक | 19 नोव्हेंबर 2023 : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला मंत्री आणि ओबीसी मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यांनी जालन्यात एल्गार महासभा घेतली. या महासभेत भुजबळांनी दमदार भाषण केलं. मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले. भुजबळांचं घर स्वत:चं नसून ते सांताक्रुझमधील फर्नांडिस कुटुंबाचं असल्याचं त्यांनी म्हटलं. या आरोपांना छगन भुजबळ यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. हा बदनामीचा डाव असल्याचं समीर भुजबळ म्हणालेत. तसंच जागेच्या व्यवहारावेळी काय झालं ते त्यांनी सविस्तर सांगितलं.

सांताक्रूझमधल्या आमच्या निवासस्थानाच्या जागेबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र वस्तिस्थितीत अशी आहे की, सदर जागा हि बॉमबे ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची आहे. श्री फ्रान्सिस फर्नांडिस हे लिझ होल्डर म्हणजे मालक होते. त्यांनी त्यांची मुलीला लिझचे हक्क श्रीमती शैला अथायडे ह्यांना दिली होती. म्हणजेच त्या ह्या जागेच्या खऱ्या मालक होत्या.त्यांनी सदर जागेसंबंधी हक्क POA द्वारे त्यांचे भाऊ श्री व सौ फर्नांडिस ह्यांना दिले होते, असं समीर भुजबळ म्हणालेत.

फर्नांडिस कुटुंबीयांनी या प्रकरणी कोर्टात कन्सेंट टर्म्स फाईल करून सर्वप्रथम मेसर्स पाल्म शेल्टर्स या रहेजा बंधूंच्या कंपनीसोबत व्यवहार केला होता. त्यांनी १० वर्षे काहीही काम केलं नसल्यामुळे श्री आणि सौ फर्नांडिस हे नव्या डेव्हलपर्सच्या शोधात होते. त्या कामी त्यांना श्री.फ्रेडरिक नर्होणा या सोसायटीच्या सचिवांना नवीन डेव्हलपर शोधावा यासाठी विनंती केली. त्यानुसार आमच्या मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या संपर्कात ते आले, असं समीर भुजबळ यांनी सांगितलं आहे.

परवेश कन्स्ट्रक्शनने सर्व विषय मांडला. त्यानुसार फर्नांडिस कुटुंबियांना त्याच सोसायटीमध्ये इतरत्र फ्लॅट्स देण्याच्या करारानुसार आमच्या कंपनीने सर्व मोबदला हा मेसर्स पाल्म शेल्टर्स आणि फ्रेडरिक नर्होणा यांना दिला होता. त्या बदल्यात सादर जागेसंबंधी सर्व हक्क आमच्या कंपनीला मिळाले होते. मोबदला दिल्यानंतर सप्टेंबर 2003 मध्ये श्री अणि सौ फर्नांडिस यांनी आमच्या परवेश कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या नावे रजिस्टर POA सुद्धा केली होती. परंतु २००५ मध्ये आम्ही बांधकामास सुरुवात केल्यानंतर आमचे फ्रेडरिक नर्होणा ह्यांच्याशी पटत नाही. या कारणास्तव तो करार रद्द करावा, अशी भूमिका घेतली. आम्ही फ्रेडरिक नर्होणा यांच्याशी संपर्क केला. तेव्हा त्यांच बांधकाम सुरु आहे. लवकरच त्यांना पझेशन देण्यात येईल असे सांगण्यात आलं. मात्र फेड्रिक नारोना यांच्याकडून फ्लॅट घेण्याबाबत फर्नांडिस कुटुंबीयांनीच नकार दिला, असं म्हणत समीर भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.