पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला काँग्रेसवर निशाणा; म्हणाले विरोधी बाकड्यावर पण नसेल स्थान

Narendra Modi in Nashik : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंबर कसली आहे. ते महाराष्ट्रात ठिय्या देऊन आहेत. नाशिकमधील जाहीर सभेत आज त्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. काँग्रेसचं निवडणुकीनंतरच एकप्रकारे भाकितच त्यांनी वर्तविले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला काँग्रेसवर निशाणा; म्हणाले विरोधी बाकड्यावर पण नसेल स्थान
काँग्रेसवर मोदींची सडकून टीका
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 4:23 PM

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. यापूर्वी चौथ्या टप्प्यासाठी ते तळ ठोकून होते. तर आता राज्यात पुन्हा एकदा ते डेरेदाखल झाले आहेत. काँग्रेस तर प्रमुख विरोधी पक्ष पण होऊ शकणार नाही, असे मोठे वक्तव्य पंतप्रधानांनी नाशिकमधील जाहीर सभेत केले. नाशिकच्या पिंपळगावात त्यांची जाहीर सभा सुरु आहे. त्यांनी काँग्रेसवर तुफान हल्लाबोल केला.

आशिर्वाद मागायला आलो

तुमची सेवा हेच माझ्या जीवनाचं सर्वात मोठं लक्ष्य आहे. तुम्ही गेल्या दहा वर्षात माझं काम पाहिलं आहे. आता मी तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आलो आहे. तिसऱ्या कार्यकाळासाठी आशीर्वाद मागायला आलोय. विकसित भारत करण्यासाठी आशीर्वाद मागायला आलो आहे, असे भावनिक आवाहन पंतप्रधानांनी राज्यातील जनतेला केले आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस विरोधी पक्षही नसेल

एनडीए आघाडीला मोठा विजय मिळणार आहे, याची माहिती इंडिया आघाडीच्या मोठ्या नेत्याच्या विधानातून कळतं. त्यांना माहीत आहे की, इंडिया आघाडीचा प्रमुख पक्ष काँग्रेस आहे. काँग्रेस प्रचंड प्रमाणात हारणार आहे. काँग्रेस विरोधी पक्षही बनू शकणार नाही. त्यामुळेच इथल्या नेत्याने त्यांनी सर्व छोटे छोट्या पक्षांना सल्ला दिलाय की, निवडणुका संपल्यानंतर सर्व छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं आहे. म्हणजे आपले आपले शटर बंद केले पाहिजे. त्यांना वाटतं सर्व दुकान त्या दुकानात गेले तर काँग्रेस विरोधी पक्ष बनेल. ही यांची परिस्थिती आहे, असा घणाघात त्यांनी केला.

पुन्हा राम मंदिराचा आवळला सूर

काँग्रेसने प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणाला ठोकर मारल्याची त्यांनी सभेतून जनतेला आठवण करुन दिली. त्याच मार्गावर उद्धव ठाकरे यांची नकली शिवेसना गेल्याचा सूर त्यांनी पुन्हा आळवला. काँग्रेसचे लोक मंदिरावरुन वेडेवाकडे काहीतरी बोलत असतात, असा आरोप त्यांनी केला. वीर सावरकरांना शिव्या देणाऱ्या काँग्रेसला डोक्यावर घेतलं जात आहे. राज्यातील स्वाभिमानी जनता हे पाहत आहे. राज्यातील लोकांचा राग वाढला आहे. काँग्रेसच्या पुढे गुडघे टेकणाऱ्या नकली शिवसेनेला शिक्षा देण्याचं महाराष्ट्राने ठरवलं आहे, असे ते म्हणाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.